वावी | वार्ताहर

सिन्नर तालुक्यातील मिरगाव परिसरात बिबट्याची दहशत वाढल्याने परिसरातील शेतकरी भयभीत झाल्याचे दिसून येत आहेत....

काल सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास सुमारास संतोष बैरागी यांच्या शेतात बिबट्याची जोडी राजरोसपणे वावरत असल्याचे निदर्शनास आल्याने येथील शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन घराच्या बाहेर पडावे लागत आहे.

काल सायंकाळच्या सुमारास कुत्रा ओरडण्याचा आवाज येऊ लागल्याने त्यांनी आवाज दिशेने धाव घेतली यावेळी यांनी बॅटरी लावून शोधाशोध करीत असताना अचानक एक बिबट्या त्यांच्या समोरून पलायन करताना दिसून आला.

तर दुसऱ्या बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करत त्याला फस्त केल्याचे दिसून आले. अशा परिस्थितीत यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क करून वनविभागाला कल्पना दिली.

यावेळी पोलीस निरीक्षक सागर कोते यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत उपस्थितांना घाबरून न जाता स्वसंरक्षणासाठी उपाययोजना म्हणून व खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या.

तसेच वनविभागाची संपर्क करून तात्काळ पिंजरा लावण्यासाठी मदत करण्याची मागणी केली. यावेळी वनविभागाच्या वतीने वनक्षेत्रपाल के आर इरकर यांनीं तात्काळ पिंजरा बसविल्याचे समजते आहे.