सिन्नर । वार्ताहर

तालुक्यातील देवपूर येथे बिबट्याने शेळी फस्त केल्याची घटना आज (दि.4) दुपारच्या सुमारास घडली...

डांबरनाला आणि कोलधाव परिसरात गेल्या दोन-चार दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे दहशत पसरली आहे.

पुंडलिक गडाख यांच्या मालकीच्या शेळीवर बिबट्याने हल्ला केला. त्यावेळी गडाख यांनी बिबट्याच्या दिशेने आपल्या हातातील काठी फिरकावली.

काठीला न जुमानता बिबट्याने शेळी घेऊन धूम ठोकली. या घटनेमुळे डांबरनाला व कोलधाव परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे.

वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.