सातपूर : करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी घरातच केले नमाजपठण
नाशिक

सातपूर : करोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी घरातच केले नमाजपठण

Abhay Puntambekar

सातपूर । प्रतिनिधी

सातपूर परिसरातील मुस्लिम बांधवांच्या वतीने रमजान ईदच्या निमित्ताने घरातच नमाज अदा करून संपूर्ण देशाच्या स्वास्थ रक्षणाची ईश्वरा कडे प्रार्थना करण्यात आली.

सातपूर व अंबड लिंक रोड या परिसरात मुस्लिम बांधवांची एकूण सहा प्रार्थनास्थळे आहेत. दरवर्षी या ठिकाणी हजारोंच्या संख्येने बांधव सामुदायिक नमाज अदा करत असतात. करोनाच्या संकटामुळे व प्रशासनाच्या सातत्याने केलेले आवाहनामुळे सामाजिक स्वास्थ्यासाठी मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठणं न करता निवडक पाच जणांच्या माध्यमातून मशिदीमध्ये नमाज अदा करण्यात आला त्यानंतर सर्व ;समाज बांधवांना आवाहन केले.
रितीरिवाजाप्रमाणे मस्जिदमधील मुख्य नमाज झाल्यानंतर आपापल्या घरी नमाजपठण केले.

सातपूर गावातील रजविया मस्जिद, अशोक नगरीतील मदरसा तसेच अंबड लिंक रोडवरील नुरी मस्जिदत सह इतर तीन प्रार्थना स्थळांवर प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार नमाज अदा करण्यात आले. सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे व व अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौधरी यांनी शुभेच्छा दिल्या.

सातपूर येथे मौलाना मुज्जवर हुसेन, मौलाना शकील अहमद, मौलाना तहमिज रझा, हाजी फारूक पठाण, नजरुल्ला अन्सारी त्यांनी मुख्य नमाज अदा केले सातपूर येथील रझविया मज्जीद येथे मौलाना अकबर मुजाहिदी, मौलाना अकताब आलम, हाजी उस्मान भाई, फैयाज खान यांनी नमाज अदा केले

मागील शंभर वर्षात पहिल्यांदा असा प्रसंग ओढवला आहे देशावरील संकटाला मात करण्यासाठी मुस्लिम बांधवांनीही ईश्वराला साकडे घातले आहे यंदाच्या वर्षात दोन महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ‘शबे मिराज’ व ‘शबे कदर’ या दोन पवित्र रात्रींचा उत्सव साजऱा करता आला नाही. पुढील दोन महिन्यानंतर येणाऱ्या संपूर्ण वर्षातील दुसऱ्या ‘ईद’ च्या पूर्वी वातावरण पूर्ववत होईल अशी ईश्वराकडे प्रार्थना करू या.
-हाजी फारुख भाई पठाण

Deshdoot
www.deshdoot.com