सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप
नाशिक

सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप

Abhay Puntambekar

सटाणा । प्रतिनिधी

करोनामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून शेतीची कामेही बंद असून प्रामुख्याने ग्रामीण भागातील मजुरवर्गाची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. अडचणीत असलेल्या मजूरवर्गाच्या कुटूंबाला हातभार लावण्यासाठी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून लाखो रुपयांचे जीवनावश्यक वस्तुंचे मोफत वाटप करण्यात येत असल्यामुळे संबंधितांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

तालुक्यातील मोरेनगर,इंदिरा नगर,अचानक नगर परिसरात आ.दिलीप बोरसे, तहसिलदार जितेंद्र इंगळे, कृउबाच्या माजी सभापती मंगला सोनवणे,जि.प. सदस्या मिना सुरेश मोरे यांच्या हस्ते मजूरवर्गासह दिव्यांग व्यक्तींना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.

करोना सारख्या विषाणूशी सामना करतांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रविण सोनवणे व मंगला सोनवणे यांच्या मार्फत संपूर्ण गावात भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या अरसेनिक अल्बम -३० ह्या होमिओपॅथीक औषधाच्या गोळयांचे वाटप मोफत करण्यात आले.

यावेळी सरपंच सुरेश जाधव, उपसरपंच मणिषा आहीरे, खुशाल मोरे,भरत अहीरे, बाळकृष्ण देवरे, बाळासाहेब मोरे, सचिन सोनवणे, सुरेश अहीरे , हेमराज बागुल, भैय्या सोनवणे, कुणाल सोनवणे, सुभाष सोनवणे, अनिल सोनवणे, नंदू मोरे आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com