नाभिक समाजाच्या व्यवसायास शासनाने न्याय देण्याची मागणी, व्यवसाय बंद मुळे उपासमारीची वेळ
नाशिक

नाभिक समाजाच्या व्यवसायास शासनाने न्याय देण्याची मागणी, व्यवसाय बंद मुळे उपासमारीची वेळ

Abhay Puntambekar

सातपूर । प्रतिनिधी

करोना केस कर्तन केल्याने होतो असे म्हणणे चुकीचे आहे सुरक्षिततेच्या साधनांचा वापर करून व्यवसाय करणे शक्य असताना करोना होण्याच्या भीतीमुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने या व्यवसायाकडे लक्ष देऊन समाज बांधवांना न्याय देण्यात यावा अशी मागणी नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आली आहे

सातपूर सौभाग्य लॉन्स येथे आज सोशल डिस्टंसिंग चा नियम पाळून संस्थापक अध्यक्ष नाना वाघ यांच्या उपस्थितीमध्ये नाभिक समाजाची बैठक झाली. नाभिक बांधव रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून सर्व प्रकारची काळजी घेण्यास मान्य असताना अथवा त्या आशयाची निर्बंध लावण्यात येऊन परवानगी देणे गरजेचे आहे.

शासनाने निर्देशित केलेल्या सर्व बंधनांचे पालन समाज बांधव करतील मात्र व्यवसाय बंद केल्याने नाभिक समाज बांधवांना उपासमारीची वेळ आली आहे याबाबत शासनाने तातडीने विचार करून या व्यावसायिकांना न्याय द्यावा अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. सोशल डिस्टन्स ठेवून ही बैठक संपन्न झाली यावेळी नाभिक समाजाचे विद्यमान अध्यक्ष गोपी सैंदाणे, अरुण वाघ, विकास पगारे, संदीप डाके, वासुदेव निकम, भारत महाले, पंकज निकम, राजेंद्र सोनवणे, अजय आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

समाजात वावरताना सर्वच स्तरातील लोकांशी संपर्क येतो गेल्या काही दिवसात आर्थिक स्थिती खालावल्याने उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे मात्र ठीक ठीकाणी वाटप होणाऱ्या अन्नदानाच्या रांगेत उभे राहणे अशक्य होत आहे शासनाने तातडीने याबाबत लक्ष देणे गरजेचे आहे.
-एक व्यवसायिक

Deshdoot
www.deshdoot.com