बुलेटच्या धडकेत एक ठार
नाशिक

बुलेटच्या धडकेत एक ठार

Abhay Puntambekar

नाशिक : प्रतिनिधी

भरधाव वेगातील बुलेटच्या धडकेत मोपेडचालक ठार झाल्याची घटना नाशिक – पुणा रोडवर घडली. शिवराज विक्रम कावळे (२५) असे या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव ऄहे.

मुनाफ शेख (रा. दत्त मंदिराजवळ) यांच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता. २८) शिवराज कावळे हा त्याच्या ऍक्‍टिवा मोपेडवरून (एमएच १५ जीडी २२८९ ) घराकडे जात होता. त्यावेळी पुना रोडवर भरधाव वेगात आलेल्या बुलेटने (एमएच १५/९००२) मोपेडला जोरदार धडक दिली.

या अपघातामध्ये कावळे गंभीररित्या जखमी झाला. तर संशयित बुलेटस्वार घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी उपनगर पोलिसात अज्ञात बुलेटस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक लोंढे हे तपास करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com