विजयनगर येथील उद्यानास ‘शिवछत्रपती उद्यान’ नामकरण
नाशिक

विजयनगर येथील उद्यानास ‘शिवछत्रपती उद्यान’ नामकरण

Abhay Puntambekar

नाशिक | प्रतिनिधी 

शिवजयंती चे औचित्य साधून विजयनगर येथे तयार होत असलेल्या उद्यानाला ला ‘शिवछत्रपती उद्यान’ हे नाव आज विशाल डोखे यांच्या संकल्पनेतुन देण्यात आले. नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या पेलिकान पार्क चे सेंट्रल पार्क असे नामकरण करून नवीन नाशिक ला वैभव प्राप्त करून देणारे उद्यानाचे काम चालू झाले मात्र आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी युवक कांग्रेस नवीन नाशिक विभागीय अध्यक्ष विशाल नारायण डोके यांनी शिवछत्रपती उद्यान म्हणून सर्वपक्षीय शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या उद्यानाचे नामकरण केले.

आज शिव जन्मोत्सवानिमित्त नवीन नाशिक मधील शेकडो कार्यकर्त्यांचं शेकडो शिवप्रेमींनी कोणत्याही पक्षाच्या भावना दुखावू नयेत यासाठी ‘शिवछत्रपती उद्यान’ असे नामकरण डोके यांच्या संकल्पनेतून देण्यात आले व नवीन नाशिक मधील सर्व शिवप्रेमींनी या नामकरणाचे स्वागत केले.

नवीन नाशिक मध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून अद्यावत असे उद्या या ठिकाणी करण्यात येत आहे छत्रपती शिवरायांच्या नावाने सदर उद्या उद्यानाचे नामकरण केल्याने सदर उद्यान हे पवित्र होऊन समाजापुढे एक आदर्श निर्माण करण्याचा उदांत हेतू समोर ठेवून हे कार्य केल्याचे डोके यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब जमदाडे, दिपक मराठे, संजय भामरे, सुनिल जगताप, डॉ. संदीप मंडलेचा, शंकर पांगरे, रोहित जगताप, अमित खांडे, प्रितम भामरे, योगेश गांगुर्डे, आशिष हिरे, विजय पाटील, लक्ष्मण जायभावे, आदींसह सर्व पक्षिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com