सातपूर क्लब हाऊस मैदानावरील भाजीबाजार सुरु करण्याची मागणी
नाशिक

सातपूर क्लब हाऊस मैदानावरील भाजीबाजार सुरु करण्याची मागणी

Abhay Puntambekar

सातपूर । प्रतिनिधी

सातपूर गावासाठी वसलेल्या छत्रपती शिवाजी मंडई या बाजार पेठला प्रशासनाने टाळे ठोकल्यानंतर भाजी व्यवसायिकांची व भाजी घेणाऱ्यांची ससेहोलपट सुरू झाली

छत्रपती शिवाजी मंडळी मधील बाजार बंद केल्यानंतर भाजी व्यवसायिकांनी काही काळासाठी भाजीबाजार त्रंबक रोड मांडला होता मात्र त्या ठिकाणी गर्दी होऊ लागल्याने शेवटी प्रशासकांनी भाजीबाजार हा क्लब हाऊस मैदानावर बसवण्याचा निर्णय घेतला गेल्या काही दिवसांपासून क्लब हाऊस मैदाना वरील भाजी बाजारही प्रशासनाने बंद केला आहे.

सातपूर कॉलनी मध्ये करोना रुग्ण सापडल्यामुळे त्या परिसराला प्रतिबंधित करण्यात आले आहे प्रतिबंधित परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्केट व त्यालगत बसवण्यात आलेला भाजी बाजार हे दोन्ही परिसर बंद केलेले असल्याने भाजी व्यवसायिकांची नागरिकांची अडचण निर्माण झाली आहे.

कॉलनीत भाजीपाला नाही गावात तील क्लब हाऊस मध्ये ही भाजीपाला बंद त्यामुळे भाजीपाला मिळविण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे  सातपूर क्लब हाऊस मैदानावरील भाजीबाजार तातडीने सुरु करावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com