रुग्णालयात पी पी ई किट चे वाटप करून वाढदिवस साजरा
नाशिक

रुग्णालयात पी पी ई किट चे वाटप करून वाढदिवस साजरा

Abhay Puntambekar

 नाशिक । प्रतिनिधी

आपण सुरक्षित असण्याचे मोठे श्रेय हे करोना योध्यांचे आहे, हे लक्षात घेता इंदिरा नगर येथे राहणाऱ्या तेजस चौधरी युवकाने २३ वा (दि.२६ मे रोजी) वाढदिवस वडाळा येथील डॉक्टर व परिचारिका, स्टाफ याना पी पी ई किट देऊन साजरा केला.

वडाळा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ पुंडलिक पाठक, संगीता सातपुते,प्रीती सूर्यवंशी, प्रियांका पटसाळगे, निर्मला तुपे, सागर महाले,प्रवीण वाघ, सचिन मांडे, फार्मसिस्ट सोळंकी यांना पी पी ई किट देवून सन्मान करत वाढदिवस साजरा केला.

यावेळी डॉक्टर , परिचारिका कर्मचारी तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पाटील शिवसेना विभाग प्रमुख निलेश साळुंखे, ईश्वर चौधरी,सुनीता चौधरी दिपक साळुंखे,आकाश काळे, उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com