ओझर गावात रक्तदान शिबिराचे आयोजन, १०६ पिशवी रक्त संकलन
नाशिक

ओझर गावात रक्तदान शिबिराचे आयोजन, १०६ पिशवी रक्त संकलन

Abhay Puntambekar

ओझर । प्रतिनिधी

करोना आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाने रक्तपेढ्यांमध्ये असलेला रक्तसाठा कमी असल्याकारणाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या रक्तदानाच्या आव्हानाला ओझर गावाने भरभरून प्रतिसाद देत १०६ पिशवी रक्त संकलन करून दिले.

ओझर गावातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .सेनिटाइज़र,मास्क, सोशल डिस्टनसिंग ,पानी,व सावली यांची दक्षता घेउन शिबिर पार पडले.

रक्तदान शिबिरास डॉ. टर्ले , डॉ. समीर खाटिक , ओझर पोलिस प्रशासन ,ओझर आरोग्य केंद्र,ओझर महसूल विभाग व ओझर ग्रामपालिका ,स्व. अशोकराव बनकर पतसंस्था . धर्मविर संभाजी महाराज चौक,शिवनेरी मित्र मंडळ, यांचे सहकार्य लाभले.

शिबीर यशस्वी ते साठी सुशांत रणशूर,तेजस बोरा,महेश ठाकरे,विशाल सदानशिव,अभिषेक येनकर ,संतोष सोनवणे शब्बीर खाटीक, कांचनमाला हुजरे,नरेंद्र थोरात ,निलेश शिंदे ,दिपक कदम, तुषार निकम यांनी परिश्रम घेतले .

Deshdoot
www.deshdoot.com