इगतपुरीत मुसळधार; कसारा घाटात दरड कोसळली; मध्य रेल्वे ठप्प

इगतपुरीत मुसळधार; कसारा घाटात दरड कोसळली; मध्य रेल्वे ठप्प

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

इगतपुरीत गेल्या दोन दिवसांपासुन मुसळधार पाऊस सुरु आहे. (Heavy rain in Igatpuri) पावसामुळे कसारा घाटात पुन्हा रेल्वे रुळावर दरड (Land slide at Central railway) कोसळल्याची घटना घडली. रेल्वेच्याओव्हरहेड वायरवर झाड पडल्यामुळे मध्य रेल्वेची १२ तास वाहतुक ठप्प झाली होती....(Tree Collapsed at overhead wire)

कसारा घाटातील मध्य रेल्वेच्या जव्हार फाटा (Javhar phata) जवळील पोल क्र. 125/400 जवळ डाऊन मार्गावर दरड कोसळली. त्याच्याच पुढे ओव्हरहेड वायरवरही (Overhead wire) झाड पडले आहे. तसेच कथरुवंगण वाडी (Katharuvanganwadi) येथील पोल क्र.131/3 जवळील मिडल लाईनच्या रुळावर मातीचा खच पडला.

तसेच मानस हॉटेल मागील पोल क्र. 133/53 अप लाईनच्या रेल्वे रूळा खालील खडी वाहून गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक १२ तास ठप्प झाली होती. रात्रभर रेल्वे प्रशासन व कर्मचारी कसारा घाटात रेल्वे मार्ग सुरळीत करण्यासाठी युध्द पातळीवर काम करत असुन ओव्हरहेड वायर वरचे झाड काढण्यात यश आले.

मात्र, रुळा जवळ पडलेला भला मोठा दगड काढण्यासाठी जेसीबी रुळा जवळ नेण्यास अडचण येत असल्यामुळे हा दगड काढण्यास मोठी अडचण निर्माण झाली होती. त्याचप्रमाणे कसारा स्थानका पुढील उंबरमाळी, वासिंद स्थानकात रेल्वे प्लॅटफार्म पर्यंत पावसाचे पाणी साठल्याने दोन्ही मार्गावरची रेल्वे वाहतुक पुर्णता: ठप्प झाली.

मध्य रेल्वेची दोन्ही मार्गाची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे गोरखपूर, हावडा, पवन एक्सप्रेस इगतपुरी स्थानकात रद्द करण्यात आल्या असून राज्यराणी, पंचवटी, सेवाग्राम एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस ह्या रद्द करण्यात आल्या होत्या.

इगतपुरी रेल्वे स्थानकावर गाड्या उभ्या केल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी असून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना कल्याण व मुंबईला जाण्यासाठी बसेसची सोय केली असून आता पर्यंत १८ बसेस कल्याणच्या दिशेने रवाना करण्यात आल्या.

प्रवाशांची गर्दी पाहुन ४० बस रेल्वे प्रशासनाने मागविल्या. तर मुंबईहुन नाशिककडे (Nashik Mumbai railway ) येणाऱ्या गाड्या वसई विरार मार्गे वळविण्यात आल्या असून भुसावळहुन मुंबईकडे येणाऱ्या गाड्या जळगाव मनमाड मार्गे वळविण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

कसारा घाटात मध्य रेल्वेच्या डाऊन व मिडल लाईन कोसळलेल्या दरडी व माती हटविण्याचे काम सुरू असुन अप लाईन खालील वाहून गेलेल्या खडीचे पुन्हा भराव करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.

एनडीआरएफ (NDRF) व आरपीएफ (RPF) तसेच रेल्वे कर्मचाऱ्याची टीम घटनास्थळी दाखल असून अजून मध्य रेल्वेची सेवा चालू होण्यास आणखी काही कालावधी लोटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com