नाशिकच्या कोमल जगदाळे, दिनेशला सुवर्ण

महाराष्ट्र राज्य ऍथलेटिकस निवड चाचणी; आज १२ प्रकारात निवड चाचणी संपन्न
नाशिकच्या कोमल जगदाळे, दिनेशला सुवर्ण

नाशिक | प्रतिनिधी

पतियाला, पंजाब येथे दिनांक २५ जून ते २९ जून, २०२१ दरम्यान ६० व्या राष्ट्रीय ऍथलेटिकस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे...

पुढील महिन्यात २३ जुलै ते ०८ ऑगस्ट, २०२१ दरम्यान टोकियो जपान येथे होणाऱ्या ऑलीम्पिक स्पर्धेसाठी या राष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी ग्राह्य धरण्यात येणार आहे. भारताच्या खेळाडूंना ही एकमेव आणि शेवटची संधी असणार आहे.

महाराष्ट्राच्या काही दर्जेदार खेळाडूंना ऑलीम्पिकमध्ये सहभाग मिळविणासाठी ही चांगली संधी असणार आहे. त्यामुळे आज दिनांक १६ जून रोजी नाशिकच्या स्व. मिनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथील सिन्थेटिक ट्रॅकवर आयोजित या निवड चाचणीमध्ये खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी पेश केली.

सध्या करोनाचा प्रधुरभाव असल्यामुळे भारतीय ऍथलेटिकस असोसिएशन , भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाने नेमून दिलेल्या संपूर्ण नियमांचे (SOP ) पालन करून या नियमाप्रमाणे या निवड चाचणीच्या वेळापत्रकाचे नियोजन करण्यात आले आहे.

या नियमाप्रमाणे सादर निवड चाचणी आज सकाळी ०६.०० ते.०८. ३० या वेळेतच पार पडली. . आज सकाळी सहा वाजता १०,००० हजार मीटर धावणे या पहिल्या स्पर्धेला सुरवात झाली यामध्ये नाशिकच्या दिनेशने सुवर्णपदक तर रोहित यादवने रौप्य पदक पटकावले.

३००० मीटर स्टिपल चेस शर्यतीत नाशिकच्या कोमल जगदाळेने सुवर्णपदक पटकावून आपल्या ऑलीम्पिकच्या प्रयत्नांना दुजोरा दिला. १०,००० हजार मीटर धावणे या महिलांच्या शर्यतीत निकिता राऊत आणि प्राजक्ता गोडबोले यांनी सुंदर धाव घेत अनुक्रमी पहिला आणि दुसरा क्रमांक मिळविला.

महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत यमुना लाड्कातने पाहिला तर ताई बामणे हिने दुसरा क्रमांक मिळविला. पुरुषांच्या १०० मीटर धावणे शर्यतीत सौरंभ निकमने प्रथम, करण भोसलेने दुसरा तर अक्षय खोत याने तिसरा क्रमांक मिळविला.

उद्या दिनांक १७ जून रोजी अश्याच प्रकारे सकाळी ०६. ०० वाजता निवड चाचणीला सुरवात होणार असून यामध्ये पुरुषांच्या आणि महिलांच्या ५,००० मीटर धावणे या स्पर्धेपासून सुरवात होणार आहे त्यानंतर पुरुषांची लांब उडी, २०० मीटर धावणे तर महिलांच्या भाला फेक, २०० मीटर धावणे, लांब उडी, हातोडा फेक हे प्रकार होणार आहेत.

त्यानंतर पुरुष आणि महिलांची उंच उडी, ११० मीटर , १०० मीटर. आणि ४० मीटर हर्डल्सस्पर्धा होणार असून सर्वात शेवटी ८०० मीटर धावणे. अश्या प्रकारे निवड चाचणी पार पडणार आहे अशी माहिती स्पर्धा आयोजन प्रमुख हेमंत पांडे यांनी दिली.

भारताचे ऑलिंपियन खेळाडू, अर्जुन पुरस्कार प्राप्त तथा महाराष्ट्र ऍथलेटिकस असोसिशनचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी या स्पर्धेच्या आयोजनाचा आणि इतर सर्व व्यवस्थेचा आढावा घेतला आणि आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले.

आजच्या निवड चाचणीचे निकाल -

पुरुष - १) १०, ००० मीटर धावणे - दिनेश - प्रथम, रोहित यादव - दुसरा क्रमांक , संकल्प घाडगे - टसर क्रमांक. २) १५०० मीटर धावणे - सुरज खिहरे - प्रथम, करण माळी - दुसरा क्रमांक, अंकित नवघणे - तिसरा क्रमांक. ३० गोळा फेक - समर्थ साकर - प्रथम, ओम तेलोकर - दुसरा क्रमांक,४) १०० मीटर धावणे - सौरभ निकम - प्रथम, करण भोसले - दुसरा क्रमांक, अक्षय खोत - तिसरा क्रमांक. ५० ट्रिपल जम्प - कृष्ण सिंग - प्रथम, अनिलकुमार हद्दु - दुसरा क्रमांक, पुंजाजी चौधरी - तिसरा क्रमांक.

महिला - १) १०, ००० मीटर धावणे महिला - निकट राऊत - प्रथम, प्राजक्ता गोडबोले - दुसरा क्रमांक. २) १५०० मीटर धावणे - योनीने ठाकरे - प्रथम, ३) १०० मीटर धावणे - हिंद्रा वल्लाडेरेस - प्रथम, सुदेष्णा शिवाकर - दुसरा क्रमांक,सिद्धी हिरे - तिसरा क्रमांक. ५) ०० मीटर धावणे - यमुना लडकत - प्रथम, ताई बामणे - दुसरा क्रमांक, अनुष्का कुंभार - तिसरा क्रमांक. ५) गोळा फेक - सिमरन पवार - प्रथम ६) ३००० मीटर स्टिपल चेस - कोमल जगदाळे - प्रथम, वैष्णवी खाडिलकर - दुसरा क्रमांक,

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com