शेतमाल वाहतुक करणाऱ्या किसान रेलला यापुढे असतील 'इतक्या' बोगी

शेतमाल वाहतुक करणाऱ्या किसान रेलला यापुढे असतील 'इतक्या' बोगी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

वर्षभरापूर्वी सुरू झालेल्या किसान रेलला (Kisan Rail) जिल्हयातील शेतक-यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. शेतीमालाच्या वाहतुकीवर शासन पन्नास टक्के सबसिडी देत असल्याने जिल्हयातील विविध तालुक्यामधील शेतक-यांचा शेकडो टन शेतमाल आठवडयातून परराज्यात विक्रीसाठी जात आहे....

शेतक-यांचा प्रतिसाद (Huge response to kisan rail by farmers) पाहता किसान रेलला नऊ ऐवजी तेवीस बोगी (twenty three bogies) असाव्यात आणि सर्वच बोगी जिल्हयातीलच शेतक-यांच्या शेतमालासाठी राखीव असाव्यात यासाठीच्या प्रयत्नांना आता यश आले आहे. आठवडयातून मनमाड येथून सहा तर देवळाली कॅम्प (Deolali Camp), नाशिकरोड रेल्वेस्थानकाहून (Nashikroad Railway Station) तीन दिवस किसान रेल (Kisan Rail) धावणार असून यापुढे स्पेशल किसान रेल ही तब्बल तेवीस बोगींची असणार आहे.

या निर्णयामुळे नाशवत शेतीमाल यापुढे रेल्वे वाहतूकीविना स्थानकावर पडून राहणार नसल्याने जिल्हयातील शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. येत्या सोमवार पासून तेवीस बोगींच्या स्पेशल किसान रेलचा देवळाली कॅम्प (Deolali Camp) येथून शुभारंभ होणार असल्याची माहिती खा हेमंत गोडसे यांनी दिली.

नाशिक जिल्हा Nashik District) हा कृषीप्रधान जिल्हा असून ८० टक्के शेतकरी शेती व्यवसायावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. भाजीपाला आणि शेतीमाल पिकविण्यात नाशिक जिल्हा अव्वल क्रमांकावर आहे. परंतु जिल्हयातील शेतीमाल रेल्वेमार्गाने इतर राज्यामध्ये पोहचविण्याची कोणतीही सुविधा नसल्याने शेतकरी त्रस्त होते. जिल्हयातील शेतीमाल विक्रीसाठी रोज रेल्वेमागनि परराज्यात नेता यावा यासाठी गेल्या तीन वर्षापासून खा.हेमंत गोडसे प्रयत्नशील होते.

वर्षभरापूर्वी गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले होते गोडसे याचे प्रयत्न आणि सततचा पाठपुरावा याची दखल घेवून केंद्रशासनाने शेतीमालाच्या वाहतुकीसाठी वर्षभरापूर्वी आठवड्यातून एक वेळेस देवळाली कॅम्प ते विहारमधील दाणापूर (Deolali Camp to Vihar Danapur) यादरम्यान धावणारी देशातील पहिली किसान रेल सुरू केली होती.

कृषीरेलला वाढता प्रतिसाद पाहून आठवड्यातून एक ऐवजी तीन दिवस किसान रेल सुरू केली होती या किसान रेलला नऊ बोगी असून नाशिक, मनमाड आणि देवळाली कॅम्प या रेल्वे स्थानकासाठी प्रत्येकी दोन बोगी शेतीमाल वाहतूकीसाठी वापरात येत असत.

परंतु शेतीमालाची प्रचंड आवक असल्याने रेल्वेस्थानकांच्या वाट्याला येणा-या या बोगी खुपच कमी पडत होत्या यातुनच गेल्या काही महिन्यांपासून किसान रेलला नऊ ऐवजी तेवीस बोगी असाव्यात यासाठी खा गोडसे यांचे प्रयत्न सुरू होते.अखेर आज गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

येत्या सोमवारपासून (दि.२३ ऑगस्ट)किसान रेल मनमाड रेल्वे स्थानकाहून आठवड्यातून सहा तर देवळाली कॅम्प नाशिकरोड रेल्वेस्थानकाहून तीन दिवस धावणार आहे. यापुढे किसान रेलला नऊ ऐवजी तेवीस योगी असणार आहे.

सोलापूर जवळील सागोला येथून येणारी किसान रेल मनमाड मार्गे जाणार असल्याने मनमाड (Manmad) येथील शेतक-यांना या रेलचा फायदा आठवडयातून सहा दिवस होणार आहे.तेवीस योगीपैकी मनमाड, देवळाली कॅम्प आणि नाशिकरोड या रेल्वे स्थानकासाठी प्रत्येकी सहा बोगी शेतीमाल वाहतुकीसाठी मिळणार आहेत. पूर्वी अवघ्या नऊ योगी असलेली किसान रेल आठवडयाभरातून तीन दिवस धावत असल्याने जिल्हयातील शेतक-यांचा शेतीमाल रेल्वेस्थानकांवर मोठया प्रमाणावर पडून राहत असे.यामुळे शेतीमालाचे मोठया प्रमाणावर नुकसान होवून शेतक-यांची कुचंबना होत असे.

यापुढे किसान रेल तेवीस बोगींची असणार असल्याने नाशवंत शेतीमालाचे नुकसान टळणार असून शेतक-यांना आपला शेतीमाल विक्रीसाठी रोज परराज्यातील बाजारपेठांचा लाभ मिळणार आहे. तेवीस योगींच्या स्पेशल किसान रेलचा प्रारंभ येत्या सोमवारपासून (दि.२३ ऑगस्ट)होणार आहे.

खासदार गोडसे यांच्या प्रयत्नातून सुरू झालेली किसान रेल यापुढे आठवडयातून मनमाड (Manmad) येथून सहा तर देवळाली कॅम्प, नाशिकरोड येथून मंगळवार, गुरूवार आणि शनिवार या तीन दिवशी किसान रेल धावणार असून यापुढे स्पेशल किसान रेल ही तब्बल तेवीस बोगींची असणार आहे.

पैकी मनमाड (manmad), नाशिक (Nashik) आणि देवळाली कॅम्प (Deolali Camp) या रेल्वे स्थानकांसाठी प्रत्येकी सहा बोगी आरक्षित असणार आहे. या किसान रेलच्या माध्यमातून रोज सुमारे पाचशे टन शेतीमाल परराज्यात जाणार आहे. यामुळे जिल्हयातील शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हावासियांना आपला शेतीमाल गुवाहाटी, कलकत्ता येथे विकिसाठी नेता यावा यासाठी रेल्वेसेवा असावी यासाठीही प्रयत्न सुरू असल्याची माहिती खा.हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com