ऐन पावसाळ्यात गंगापूर धरणाची पाणीपातळी १० टक्क्यांनी घटली; जिल्ह्यात 'इतका; आहे जलसाठा

ऐन पावसाळ्यात गंगापूर धरणाची पाणीपातळी १० टक्क्यांनी घटली; जिल्ह्यात 'इतका; आहे जलसाठा
गंगापूर धरण (File Photo)

नाशिक । Nashik

७ जूनला मान्सूनचे स्वागत (Monsoon Welcome) सर्वत्र करण्यात आले होते. मात्र, नाशिक जिल्ह्यात पावसाने (Rain In nashik District) पाठ फिरवली असून जुलै महिना उजाडला तरीदेखील पावसाचे आगमन झालेले नाही. सुरुवातीला पडलेल्या तुरळक पावसानंतर अनेक ठिकाणी पेरण्या करण्यास घाई झालेली बघायला मिळाली मात्र, पावसाने दडी दिल्याने पेरणी झालेल्या भागात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे...

नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) पावसाळ्याचा महिना असूनही तब्बल दहा टक्के धरणाच्या पाणीपातळीत घट झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुलै महिन्याचा पहिला आणि दुसरा आठवडा कमी पावसाचा सांगण्यात आला आहे. त्यामुळे धरणसाठ्यात पाण्याची पातळी (Water level of the water dams) वाढण्यासाठी सुकाळ अद्यापतरी आलेला दिसत नाही.

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाउस झाला आहे. गतवर्षी गंगापूर, दारणा या मध्यम क्षमतेच्या धरणासह उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण (North Maharashtra big dam) अशी ओळख असलेले गिरणा धरण सलग दुसर्‍या वर्षी शंभर टक्के भरले होते. इतर छोटी मोठी धरणे देखील पाण्याने लबालब भरली होती.

मोठया धरणातून विसर्ग सुरु होता. त्यामुळे यंदा मे महिना उजाडला तरी धरणांत समाधानकारक जलसाठा (Water Level) होता. यंदाच्या उन्हाळ्यात शेती व उद्योगासाठी आवर्तन देऊनही धरणांत जूनपर्यंत समाधानकारक जलसाठा होता. मात्र, या महिन्यात पावसाने दडी दिल्यामुळे धरण्साठा दहा टक्क्यांनी घटला आहे.

नाशिक शहराची तहान भागविणार्‍या गंगापूर धरणात (Gangapur Dam) जूनच्या सुरुवातीला ४६ टक्के जलसाठा होता. तर गंगापूर धरण समूहात ३१ टक्के जलसाठा होता. आजमितीस गंगापूर धरणसमूहात जलसाठा पाच टक्क्यांनी घटला आहे. तर गंगापूर धरणात आजमितीस ३६ टक्के जलसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणसमूहात असलेला जलसाठा

गंगापूर धरण समुह

गंगापूर ३६ टक्के

कश्यपी १७ टक्के

गौतमी गोदावरी १२ टक्के

आळंदी २६ टक्के

पालखेड धरणसमूह

पालखेड ३१ टक्के

करंजवण ७ टक्के

वाघाड ३ टक्के

ओझरखेड २६ टक्के

पुणेगाव ७ टक्के

तिसगाव २ टक्के

दारणा ४५ टक्के

भावली ४२ टक्के

मुकणे २४ टक्के

वालदेवी ६७ टक्के

कडवा १४ टक्के

नांदूरमध्यमेश्वर बंधारा १०० टक्के

भोजपूर १३ टक्के

गिरणा धरण समूह

चणकापूर १६ टक्के

हरणबारी ३६ टक्के

केळझर १३ टक्के

नागासाक्या शून्य टक्के

गिरणा ३३ टक्के

पुनद १४ टक्के

माणिकपुंज शून्य टक्के

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com