एकाच तिकीटावर सीएनजी बस आणि निओ मेट्रोचा प्रवास व्हावा - देवेंद्र फडणवीस

एकाच तिकीटावर सीएनजी बस आणि निओ मेट्रोचा प्रवास व्हावा - देवेंद्र फडणवीस

नाशिक | प्रतिनिधी

इंटिग्रेटेड तिकीट प्रणाली (Integrated Ticket System) वापरली गेली तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक प्रतिसाद मिळेल. यापुढे नाशिकमधील सीएनजी बसेस (CNG Buses) आणि लवकरच नावारूपाला येणारा निओ मेट्रो प्रकल्प (Nashik Nio Metro) यातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट होणार आहे. त्यामुळे या सेवांचा लाभ घेताना एकाच तिकिटावर प्रवास करता येणे शक्य होईल अशी व्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्त नाशिक होण्यास मदत होईल असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Former Chief Minister of Maharashtra Devendra Fadnavis) यांनी केले.

एकाच तिकीटावर सीएनजी बस आणि निओ मेट्रोचा प्रवास व्हावा - देवेंद्र फडणवीस
भुजबळ का म्हणाले? माझ्या घरासमोरुन बस गेली पाहिजे...

ते आज नाशिकमध्ये आयोजित सीएनजी बस (CNG Buses) सेवेच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते. ते म्हणाले की. आधुनिक शहर म्हणजे काय की, ज्या शहरात वाहतूक व्यवस्था चांगली आहे. वाहतूक बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना आल्हाददायक वातावरण उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न महापालिकेने केले आहे. अत्याधुनिक बसेसने सार्वजनिक वाहतूक होणार आहे. त्यामुळे सर्वांचे कौतुक करावेसे वाटते आहे.

आधुनिक शहरात खासगी वाहने कमी करून सार्वजनिक वाहतुकीवर भर देणे गरजेने आहे. अत्याधुनिक सार्वजिक वाहतूक सेवा सुरु झाल्यामुळे नागरिक या सेवेला पसंती देतात आणि खासगी वाहने कमी होतात. परिणामी, प्रदूषण कमी होते.

मोबाईलच्या एका क्लिकवरदेखील हे तिकीट बुक केले जाणार आहे. बसमध्ये कॅमेरे आहेत, अत्याधुनिक सुविधा आहेत. एके ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी साधी सोपी पण अत्याधुनिक सोय उपलब्ध असल्यास नागरिक पसंती देतील.

दुसरा भाग एंड तो एंड कनेक्टीव्हीटी चा महत्वाचा भाग असतो. आजपासून ५० बस जरी धावत असल्या तरीदेखील पुढे या वाढणार आहेत. ३०० मीटर चालत गेल्यास बस मिळाली पाहिजे अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्यास नागरिक या सेवेला प्रतिसाद देतील.

जगातील रेल्वेंचा अभ्यास करून नाशिकसारख्या शहरात निओ मेट्रोसारखा प्रोजेक्ट आणतो आहोत. हा प्रकल्प देशात आदर्श ठरणार आहे. नाशिकने जी निओ मेट्रो केली आहे ती केंद्र सरकारने मॉडेल अजून ८ शहरांत या मेट्रो होणार आहेत. नाशिकचे निओ मेट्रोमोडेल हे ग्लोबल होणार आहे. अंतिम मंजुरी मिळेल आणि हा प्रकल्प नावारूपाला येईल. दुसरा टप्पा म्हणजे दोन्ही वाहतूक व्यवस्थांचे एकत्रीकरण करणे होय, असेही ते म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com