वाद्यही वाजले...प्रार्थनाही झाल्या 
असा पार पडला 'ऑनलाईन स्वातंत्र्यदिन' सोहळा
नाशिक

वाद्यही वाजले...प्रार्थनाही झाल्या असा पार पडला 'ऑनलाईन स्वातंत्र्यदिन' सोहळा

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

नाशिक |अश्विनी दसककर भार्गवे/सुभाष दसककर

वाऱ्यावर दिमाखात फडकत असलेला तिरंगा...'राष्ट्रध्वज को सलामी देंगेssss सलामी दो' म्हणताच सलाम करत मानवंदना देणारे हात...दुसऱ्याच क्षणी वाद्यांच्या गजरात, तालासुरात राष्ट्रगीत गाणारे तिसरी ते दहावीचे जवळपास 300 विद्यार्थी, सगळ्या ताई (शिक्षिका)...आणि एकूणच माहौल असा की... 'जय हे जय हे जय हे' म्हणतांना सर्वांग शहारले जाणार!!!

'भारssssत माता की' नंतरचा 'जयsss' तर असा काही दुमदुमून जाणार की, भावी उभरत्या सक्षम पिढीच्या निस्सीम देशप्रेमाची साक्ष असावी ! लगोलगच सगळ्या मुलांकडून उत्साहाने जोशपूर्ण सादर होणारी तीन, चार देशभक्तीपर गीते. त्यात एक आवर्जून गायले जाणारे दुसऱ्या एखाद्या भाषेतील गीत. ताईंच्या मदतीने मुलांनी सादर केलेली छोटी भाषणे. दहावीतून अकरावीत गेलेल्या मुलांचा रंगलेला कौतुक सोहळा आणि शेवटी 'वंदे मातरम' ने सांगता होऊन मुलांना ताईंकडून प्रेमाने मिळालेल्या जिलबीची अवीट चव !

हे सगळं आनंदाचं, उत्साहाचं वातावरण अनुभवतो आम्ही...दरवर्षी...

15 ऑगस्ट च्या आधी आठ दहा दिवस प्रॅक्टिस ची धामधूम सुरू होत असे. ...या वर्षी हा अनुभव मिस करावा लागला.

आनंद निकेतनमध्ये 'स्वातंत्र्यदिन'

15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्यदिन तेवढ्याच उत्साहात साजरा करण्यासाठी आम्ही सज्ज होतो. ठरल्याप्रमाणे यावर्षी 15 ऑगस्ट ला सकाळी 8.30 वाजता सगळी मुलं शाळेचा गणवेश घालून आपापल्या घरातूनच राष्ट्रगीत म्हणून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी सज्ज झाले.

यादरम्यान, शाळेकडून एक प्रातिनिधिक व्हिडीओ बनवत यासाठी सर्वांनी प्रयत्न सुरु केले होते. या व्हिडीओ मध्ये इयत्ता तिसरी ते नववी पर्यंतच्या काही मुलांचा सहभाग होता. हे गीत आहे, राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज यांचे 'या भारतात बंधुभाव नित्य असू दे । दे वरचि असा दे ।।

मुलांनी मेहनतीने हे गीत सुंदर पद्धतीने सादर केले. त्याबद्दल शाळेकडून सगळ्यांचे खूप कौतुक झाले.

हा व्हिडीओ बनवतांनाचा अनुभव शिक्षक, पालक आणि विद्यार्थी या सर्वानाच नावीन्यपूर्ण ठरला. या संपूर्ण व्हिडिओ एडिटिंगचे अवघड काम गायिका आणि संवादिनीवादिका ईश्वरी दसककर हिने साकारले!

रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल येथील स्वातंत्र्यदिन सोहळा

2020 हे वर्ष सगळ्याच बाबतीत वेगळे अनुभव देणारं ठरत आहे. 15 ऑगस्ट 2020 हा भारताचा स्वातंत्र्यदिन यंदा शाळा-शाळांमध्ये वेगळ्याच पद्धतीने साजरा झाला. सगळे विद्यार्थी व शिक्षक एकत्र येऊन दरवर्षी शाळेत अतिशय उत्साहाने हा दिवस साजरा करीत असतात.

यावर्षी मात्र, टाळेबंदीतील स्वातंत्र्यदिन शाळेने अभिनय उपक्रमाद्वारे साजरा केला. रासबिहारी स्कूलचे संगीत शिक्षक सुभाष दसककर यांनी आपल्या शाळेतील काही मुलांची निवड करून त्यांच्याकडून ऑनलाईन माध्यमातून खरा तो एकची धर्म ही साने गुरुजींची प्रार्थना बसवून घेतली.

त्यामध्ये विद्यार्थ्यांनी गायन, तबलावादन, सिंथेसायझर वादन करून हे गीत व्हिडीओ द्वारे सादर केले. या सगळ्या मुलांच्या व्हीडिओचा एकत्रितपणे एडिटिंग करून व्हीडिओ बनवला. अतिशय सुंदर पद्धतीने या मुलांनी या प्रार्थनेचे सादरीकरण केले आहे. हा व्हीडिओ शिक्षकांना, पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक वेगळा अनुभव देणारा ठरला.

एडिटिंगविषयी थोडेसे...

एडिटिंग शिकणे आणि करणे हा खुप चांगला आणि शिकण्यासारखा अनुभव होता. कारण या काळात सकारात्मक राहण्याची आणि मुलांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

व्हिडिओ एडिटिंगचे काम खूप संयमाने करण्याची गरज असते कारण या कामाला भरपूर वेळ लागतो. आधी सगळ्या मुलांचे व्हिडिओ मागवले. नंतर त्यांचे शब्द स्वरानुसार तालानुसार ते एकत्र जोडावे लागले.

यामध्ये अक्षरशः मिली सेकंदांचा विचार करावा लागला. बऱ्याचदा काही मुलांच्या उच्चरणात थोड्याफार त्रुटी जाणवल्या तेव्हा, त्यांच्याकडून परत व्हिडिओ मागवावे लागले. आणि मुलांनी देखील तितक्याच उत्साहाने परत परत करून पाठवले.

वाद्यवादन करणाऱ्या मुलांची देखील कमाल आहे. नंतर पुढचा टप्पा येतो ऑडिओ व्हिडिओशी जोडणे आणि त्यांचे ओठांच्या हालचाली बरोबर मॅच करणे. व्हिडीओ जोडत असताना प्रत्येक मुलाला न्याय मिळावा व त्याचे सादरीकरण स्वतंत्रपणे दिसावे असाही प्रयत्न केला.

- ईश्वरी दसककर

(गायिका आणि संवादिनीवादिका

व्हिडीओ एडिटिंग)

या मुलांचा होता सहभाग

शाळा रासबिहारी इंटरनशनल स्कूल

1) अनुष्का देवरे

2) हर्षीता वेंदे

3) दिव्या वेंदे

4) आदित्य वरुडे

5) आर्या मिश्रा

6) आन्या अग्रवाल

7) प्रगती ठोके

8) यशराज वाघ

9) हर्षवर्धन वाघ

10) श्रेया निरगिडे

11) सलोनी निकम

12) गीत लोढा

13) स्नेहा पाटील

14) सिद्धी देवरे

15) रुद्र आगलावे

16) ईशिका बोरा

17) पर्णवी जवळकर

18) आर्या पाठक

19) सुभाष दसककर सर

शाळा : आनंद निकेतन

१. मल्हार भार्गवे

२. गौतमी बेलगावकर

३. सानिका कशाळकर

४. इरा टिल्लू

५. स्वराज सोनजे

६. उर्वी गोसावी

७. आनंदी जाधव

८. रावी आपटे

९. वरदा दौंड

१०. कनक चव्हाण

११. उत्पला गाडगीळ

१२. सोहा गोकर्ण

१३. प्रज्योत कुलकर्णी

१४. अद्वैत जोशी

१५. आरोही भोरे

१६. अनन्या तोंडे

१७. राधिका पाटील

१८. मिहीर चौधरी

१९. गंधाली रोजेकर

२०. यशस्विनी चव्हाण

२१. सई थत्ते

२२. स्वानंदी फडके

२३. अदिती चव्हाण

२४. आळंदी बोटेकर.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com