घटना दूरुस्तीने मिळत नाही, तोपर्यंत आरक्षणाची लढाई थांबणार नाही

घटना दूरुस्तीने मिळत नाही, तोपर्यंत आरक्षणाची लढाई थांबणार नाही

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

ओबीसी आरक्षणाबाबतची (OBC Reservation) बाजू केंद्र सरकारसमोर मांडण्यासाठी स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या तोलामोलाचा अन्य कुठलाही नेता केंद्रात नाही. स्वर्गीय मुंडे असते तर आरक्षणाच्या प्रश्नावर आतापर्यंत मार्ग निघाला असता. त्यामुळे जनगणनेत ओबीसी समाजाची स्वतंत्र मोजणी व्हावी या मागणीसह केंद्र सरकार घटनादुरुस्तीसह ओबीसी आरक्षण (OBC Reservation) देत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणाची लढाई थांबणार नाही असा इशारा ओबीसीचे नेते तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला....

तालुक्यातील धोंडवीरनगर (Dhondvihir) येथे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शितल सांगळे (ZP ex president sheetal sangale) यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या महात्मा जोतिबा फुले (Mahatma Jyotiba phule) यांच्या पुतळ्याचे अनावरण भुजबळ व माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, शितल सांगळे, उदय सांगळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, पंचायत समितीचे उपसभापती संग्राम कातकाडे, पंचायत समिती सदस्य संगीता पावसे, डॉ. व्ही. एम. अत्रे, राजेंद्र जगझाप, पांडूशेठ केदार, चंद्रकांत वरदळ, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष संजय काकड, डॉ. जी. एल. पवार व्यासपीठावर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com