...म्हणून सर्व पॅथींनी एकत्र यावे, नेतृत्व मात्र आयुर्वेदाने करावे

सरसंघचालक मोहन भागवत का म्हणाले असं?
...म्हणून सर्व पॅथींनी एकत्र यावे, नेतृत्व मात्र आयुर्वेदाने करावे

नाशिक | प्रतिनिधी

देशभरात स्वस्तात आरोग्य सेवा पोहोचवायची असेल तर आयुर्वेदाशिवाय चांगला पर्याय नाही. वेगवेगळ्या पॅथींनी एकत्र आले पाहिजे. त्यांनी एकत्र येऊन स्वस्त आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यांचे सर्वांचे नेतृत्व आयुर्वेदाने करावे असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले....

सरसंघचालक भागवत दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी नाशकातील चरक सदनाचे उद्घाटन केले. त्यानंतर ते गंगापूर रोड येथील शंकराचार्य संकुलात संबोधित करत होते.

यावेळी भारतीय चिकित्सा पद्धती आयोगाचे अध्यक्ष जयंत देव पुजारी यांच्यासह आयुर्वेद व्यासपीठ अध्यक्ष रजनी गोखले, विनय वेलणकर यांची उपस्थिती होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com