विकास व उपक्रमशीलतेला प्राधान्य देणारे 'जानोरी'

पालकमंत्री छगन भुजबळ व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या भावना
विकास व उपक्रमशीलतेला प्राधान्य देणारे 'जानोरी'

जानोरी | Janori

जानोरी गाव (Janori Village) हे नेहमीच विकासाला आणि उपक्रमशीलतेला प्राधान्य देणारे असे गाव आहे. अशा भावना जानोरी ग्रामपंचायत (Janori Grampanchayat) येथील व्यापारी संकुलांच्या (Vyapari Sankul) इमारतींच्या लोकार्पण प्रंसगी राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Nashik Guardian minister Chhagan Bhujbal) आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी व्यक्त केल्या आहेत....

दिंडोरी (Dindori) तालुक्यातील ग्रामपंचायत जानोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल (Chhatrapati Shivaji Maharaj Vyapari sankul) व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व्यापारी संकुल (Krantisurya Mahatma jyotiba phule vyapari sankul) या दोन इमारतींचे लोकार्पण पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, दिंडोरी पंचायत समितीच्या सभापती कामिनी चारोस्कर, कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे, दिंडोरी उपविभागीय अधिकारी संदीप आहेर, तहसीलदार पंकज पवार, गटविकास अधिकारी चंद्रकांत भावसार, जानोरी ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता सरनाईक, उपसरपंच गणेश तिडके, प्रशासक तथा विस्तार अधिकारी आण्णा गोपाळ आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जानोरी ग्रामपंचायतीने ग्रामनिधी योजनेच्या माध्यमातून व्यापारी संकुल इमारत उभारली आहे. यासाठी ३८ लाख इतका खर्च झाला असून त्यात आठ गाळे काढण्यात आले आहेत. या गळ्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होण्यास निश्चितच उपयोग होणार असल्याचे, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यात पाऊस कमी असल्याने धरणात पाणी कमी आहे. पाणी टंचाईची समस्या जिल्ह्यावर असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन करत कोरोना पासून आपलं कुटुंब, आपलं गाव, आपला तालुका सांभाळा म्हणजेच जिल्हा आणि राज्य सांभाळलं जाईल.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत एकही रुग्ण सापडणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी, असे सांगून पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, आएसओ मान्यता प्राप्त जानोरी ग्रामपंचायत नेहमी विकासाला प्राधान्य देणारी आहे. त्यामुळे येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य स्वच्छतेला प्राधान्य देतात. जानोरी गाव भूमिगत गटार योजनेच्या माध्यमातून जोडले गेले असून याठिकाणी सांडपाण्याची प्रक्रिया करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

गावात राबविल्या जाणाऱ्या सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमाना शुभेच्छा देऊन जानोरी गाव विमानतळाजवळ असल्याने येथील गावकऱ्यांनी शेती सोबत उद्योगधंद्यानाही प्राधान्य द्यावे असेही, पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले आहे.

व्यापारी संकुलाने जानोरीच्या विकासात भर: नरहरी झिरवाळ

जानोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व्यापारी संकुल

या दोन्ही व्यापारी संकुलामुळे जानोरीच्या विकासात भर पडली आहे. तसेच वळण योजनांमुळे पहिल्या टप्प्यात वाघाड धरण भरते. या योजनेचा परिसरातील शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो आहे. पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकदरे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

कार्यक्रमात पालकमंत्री यांच्या हस्ते कोरोनाकाळात चांगली कामगिरी करणाऱ्या आशा सेविकांना दोन हजाराचे धनादेशाचे वितरण करुन सत्कार करण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com