नाशिक | प्रतिनिधी

पंचवटीतील नवनाथ नगर येथील पाेलीस रेकाॅर्डवरील हिस्ट्रीशिटर मदन पवार उर्फ मध्या याच्या घरातून पाेलीसांनी काेयता हस्तगत केला आहे....

तसेच क्रांतीनगर येथील हिस्ट्रीशिटर प्रविण कुमावत याच्या घरातूनही एक चाॅपर आणि चाकू जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी वरील दाेघा संशयितांवर हत्यार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नाशिक शहरात होणाऱ्या शरीरा विरुध्दच्या गुन्ह्यांत धारदार कोयते, चॉपर, तलवार, प्रसंगी गावठी कट्टे याचा अभिलेखा वरील सराईतांकडून वापर होत असल्याने शहराच्या सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होत आहे.

यासाठी संशयितांचा कायमस्वरूपी प्रतिबंध करण्यासाठी पाेलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार पंचवटी पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रातील सराईतांच्या घराची झडती घेण्याबाबत पूर्तता करून दिनांक १८ फेब्रुवारी २०२१ रोजी पहाटे साडेतीन ते सकाळी सातवाजे दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली.

विशेष मोहीमे बाबत परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहा, विभाग एकचे सहायक पाेलीस आयुक्त प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी अभिलेखा वरील खून, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, गंभीर दुखापत, प्राणघातक हत्यारासह दंगा करणे, दरोडा असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या हिस्ट्रीशीटरांच्या घराची झडती घेण्याबाबाबत ६ पोलीस पथक तयार करून कारवाई करण्यात केली.

संशयित मदन मारूती पवार (रा. शनिमंदिर, नवनाथ नगर, पेठरोड, पंचवटी, नाशिक) याच्या घराची झडती घेतली असता एक कोयता मिळून आला. तर प्रविण रामदास कुमावत (रा. घर नं. ४६१०, पोटीदे चाळ, कांतीनगर, मखमलाबाद रोड, पंचवटी, नाशिक) याचे घराची झड़ती घेतली असता १ चॉपर व १ धारदार चाकू असे हत्यार मिळाले.

ही कामगिरी वरीष्ठ पाेलीस निरीक्षक विलास जाधव, परिमंडळ-१ कार्यालय, सहायक पाेलीस निरीक्षक मनोज शिंदे, अभिजीत सोनवणे व त्यांचेसोबत असलेल्या पोलीस पथकाने तसेच. दुसरी कारवाई गुन्हे शाखेचे वरीष्ठ पाेलीस निरीक्षक आनंदा वाघ, सहायक पाेलीस निरीक्षक उमा गवळी, श्रीराम पवार व त्यांचेसोबत असलेल्या पोलीस पथकाने केली आहे.