परीक्षेपेक्षा हेल्मेट बरे; परीक्षेला काही सुचत नाही, लिहायला काही जमत नाही

परीक्षेपेक्षा हेल्मेट बरे; परीक्षेला काही सुचत नाही, लिहायला काही जमत नाही

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहर पोलीस (Nashik City Police) आयुक्तांनी हेल्मेटसक्तीची कडक अंमलबजावणी केली आहे. (Helmet Compulsory campaign) वेगवेगळ्या माध्यमातून हेल्मेट वापरण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त केले जात आहे. सध्या नो हेल्मेट नो कोऑपरेशन (no helmet no cooperation) मोहीम सुरु आहे. तसेच विनाहेल्मेट धारकांची ठिकठिकाणी परीक्षादेखील घेतली जात असून २० मिनिटांचा पेपर सोडविण्यासाठी अनेक बहाद्दर तासभर बसलेले दिसून येत आहेत...

नको ती परीक्षा अन् नको ती ऐनवेळी उडलेली धांदल म्हणत हेल्मेट वापरणे बरे, असे अनेकजण म्हणू लागले आहेत. शहराच्या विविध भागात या परीक्षा घेतल्या जात असल्यामुळे कुठल्याही शॉर्टकटने विनाहेल्मेट गेलेली व्यक्ती कुठेतरी पोलिसांच्या हाती लागत असल्यामुळे परीक्षार्थींची संख्या सगळीकडेच वाढलेली दिसते आहे.

विशेष म्हणजे, बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेसारखे ए बी सी डी असे प्रश्नसंच काढण्यात आले आहेत. दुसरीकडे २० प्रश्नांसाठी दहा मार्क देण्यात आले असून २० मिनिटाचा निर्धारित वेळ या परीक्षेसाठी ठेवण्यात आलेला आहे. वरून दंडही फाडावा लागत असल्याने वेळ, पैसे आणि नाचक्की यासर्व गोष्टी एकाच वेळी होत असल्याने हेल्मेटच्या दुकानांवर गर्दी वाढलेली दिसून येत आहेत.

दुसरीकडे, दुचाकीवर दोघे असतील तर, चालकाला पेपर लिहायला बसवले जाते. त्याच्या सोबत असलेली व्यक्ती अधून-मधून काहीतरी सांगण्याचा सुचवण्याचा प्रयत्न करून प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी मदत करताना दिसून येते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com