नवीन नाशिक | निशिकांत पाटील

गोविंद नगर परिसरात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने काही भाग सील केला आहे. नागरिकांसाठी औषध पुरवठा करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण परिसरात फवारणी करण्यात आली आहे...

गेल्या १० ते १२ दिवसांपासून याठिकाणी रुग्ण सातत्याने वाढत आहेत. ज्या इमारतींमध्ये रुग्णसंख्या अधिक वाढत होती त्या इमारती सील केल्या आहेत. परिसर निगराणीखाली ठेवण्यात आला असून येथून जाण्या आणि येण्याला प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

या भागात २४ रुग्ण बाधित आहेत. रुग्णसंख्या शंभर पेक्षा अधिक असल्याच्या अफवा आहेत. नागरिकांची गैरसोय होणार नाही याची प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.

नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यायची आहे. सहकार्य अपेक्षित असल्याचे डॉ बाजी यांनी सांगितले.

गोविंद नगर परिसरात सत्यम स्वीट येथील परिसरात स्वस्तिश्री अपार्टमेंट शारदा निकेतन अपारमेंट शीतल पॅराडाईज, अशोक प्राईड ,वेदाज स्पेस या तीन अपार्टमेंटमध्ये २४ नागरिक बाधित रुग्ण आढळून आले असून परिसरातील आपारमेंट चा भाग महापालिकेच्यावतीने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

महापालिकेच्यावतीने कोरोना बाधित रुग्णांना 14 दिवस प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, या ठिकाणी मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आले अशी अफवा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व करोणाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.