दहिवडला कोविड रुग्णांना घरपोच किराणा

दहिवडला कोविड रुग्णांना घरपोच किराणा

भऊर | प्रतिनिधी

देवळा तालुक्यातील दहिवड येथे निराधार वंचित करोना पाॅझिटिव्ह रूग्णांच्या घरी जाऊन मोफत घरपोच भाजीपाला व किराणा सामान, अंडी देणगीच्या माध्यमातून पोहोच करण्यात येत आहे...

तालुक्यातील दहिवड हे करोना हॉटस्पॉट बनले आहे. याची साखळी तोडण्यासाठी येथे संस्थात्मक कोरोना विलगिकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

यासाठी प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर व ग्रामपंचायत प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागरिकांनी आर्थिक मदत केली आहे.

या मदतीतून विलगिकरण कक्षातील व गावातली इतर गरजू बाधित रुग्णांसाठी भाजीपाला व किराणा माल खरेदी करून सेवा पुरविण्याची व्यवस्था करण्यात आली.

याकामी सरपंच आदिनाथ ठाकूर, पप्पू महाजन, संजय दहिवडकर दिपक सोणू , अशोक सोनवणे आदिंचे विशेष सहकार्य लाभले. सामान पोहच करण्यासाठी स्वप्नील सोनवणे यांनी मोफत वाहनाची व्यवस्था करून दिली. या सामाजिक बांधीलकीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com