ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यासाठी मागितली ८० हजारांची लाच

येवला तालुक्यातील ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात
ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यासाठी मागितली ८० हजारांची लाच

नाशिक | प्रतिनिधी Nashik

येवला तालुक्यातील निमगाव मड (Nimgaon Mad Tal yeola) येथील ग्रामसेवकास (Gramsevak) लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. स्मशानभूमीच्या कामाचे बिल मजूर करण्यासाठी ठेकेदाराकडून ८० हजार रुपयांच्या (eighty thousand rupees bribe case) लाचेची मागणी या ग्रामसेवकाने केली होती. आज नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Acb office nashik) या ग्रामसेवकावर कारवाई केली....

अधिक माहिती अशी की, बांधकाम ठेकेदार (builder) असलेल्या तक्रारदाराने ग्राम पंचायत निमगाव मड (ता. येवला) येथे जनसुविधा योजनेअंतर्गत स्मशानभूमीचे काम पूर्ण केले. दरम्यान, येथील ग्रामसेवक महेश महाले (Gramsevak Mahesh Mahale) याने ठेकेदाराने केलेल्या स्मशानभूमीच्या कामाचे बील मंजूर केल्याच्या मोबदल्यात तसेच ठेकेदाराची अनामत रक्कम परत करण्यासाठी गेल्या महिन्यात १२ नोव्हेंबर रोजी ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

दरम्यान, तडजोडीअंती ग्रामसेवकाने २० हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले होते. आज नाशिक येथील एसीबीचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने व प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, सह सापळा अधिकारी मीरा आदमाने, यांच्यासह सापळा पथकात सुखदेव मुरकुटे, विनोद पवार, संतोष गांगुर्डे, मनोज पाटील, प्रवीण महाजन यांनी सापळा रचत लाचखोर महेश महाले यास रंगेहाथ पकडले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com