जि. प. सेवक बदली प्रक्रीयेला शासनाचा हिरवा कंदील; अशा आहेत सूचना

बदली प्रक्रिया १४ ऑगस्टपूर्वी पार पाडावी लागणार
जि. प. सेवक बदली प्रक्रीयेला शासनाचा हिरवा कंदील; अशा आहेत सूचना
जि. प. नाशिक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यात कोविड-१९ (Covid 19) च्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने एकूण कार्यरत पदांच्या १५ टक्के बदली प्रक्रीया राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर ग्रामविकास विभागानेही (Rural Development) याबाबत परिपत्रक काढत जिल्हा परिषदेच्या सेवकांच्या बदल्यांबाबतचे परिपत्रक काढले आहे.शासन आदेशानुसार सेवक बदली प्रक्रीया १४ आॅगस्टपूर्वी पार पाडावी लागणार आहे....

ग्रामविकास विभागाच्या परिपत्रकानुसार प्रशासकीय १० व विनंती १० अशी २० टक्के बदली प्रक्रीया राबविली जाणार आहे. आरोग्य व ग्रामीण पाणी पुरवठा विभागात केवळ ५ टक्के सेवकांच्या बदल्या करण्याचे आदेश आहेत.

बदली प्रक्रीया दरवर्षी साधारण एप्रिल-मे महिन्यात सर्वसाधारण राबविली जाते. मात्र,मागीलवर्षी करोना संसर्गामुळे बदली प्रक्रीया राबविण्यात आली नाही. २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षात करोनाच्या

संसर्गजन्य रोगाच्या प्रादुभार्वामुळे बदली अधिनियमानुसार ३० जून २०२१ पर्यंत कोणत्याही बदल्या (सर्वसाधारण बदल्या तसेच काही अपवादात्मक परिस्थितीमुळे किंवा विशेष कारणामुळे करावयाच्या बदल्या) करण्यात येऊ नयेत,

असे आदेश शासनाने काढले होते. मात्र, कोविड या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुभार्वाचा वेळोवेळी आढावा घेऊन बदल्यांबाबत पुढील धोरण निश्चित करण्यात येणार होते. सद्य:स्थितीत राज्यात कोविडचा प्रादुर्भाव अद्याप आटोक्यात आला नाही. करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता २०२१-२२ या आर्थिक वर्षात मर्यादित स्वरूपात बदल्या करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

यासंदर्भात मागील आठवडयात सामान्य प्रशासन विभागाने १५ टक्के सेवकांच्या बदल्याचे आदेश निर्गमित केले. त्यानंतर ग्रामविकास विभागाने बुधवारी (दि.१४) सेवक बदली प्रक्रीयेबाबत परिपत्रक काढले.

यात १० टक्के प्रशासकीय बदल्या करण्यात याव्यात. तसेच १० टक्के विनंती बदली प्रक्रीया राबवावी,असे सांगण्यात आले आहे. ३१ जुलै २०२१ अखेर प्रशासकीय बदल्या कराव्यात तर, १४ आॅगस्टपर्यंत विनंती बदल्या करावयाच्या आहेत.

करोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नसल्याने अत्यावश्यक सेवेतील आरोग्य विभाग व ग्रामविकास विभागात केवळ ५ टक्के सेवकांच्या बदल्या करण्याचे आदेश आहेत. बदल्याचे परिपत्रक प्राप्त होताच सेवकांमध्ये बदल्यासाठी तयारी सुरू झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाने बदली प्रक्रीयेची तयारी केलेली आहे.

या आहेत मार्गदर्शक सूचना

सेवकांच्या सर्वसाधारण बदल्या करताना २०१४ मधील शासन आदेशाप्रमाणे ही प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. यात संबंधित पदावर विहित कालावधी पूर्ण झालेल्या सर्व पात्र अधिकारी-सेवकांपैकी ज्यांचा संबंधित पदावर जास्त कालावधी पूर्ण झाला आहे,अशा अधिकारी-सेवकांची प्राधान्याने बदली करावी.

सर्वप्रथम सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही ३१ जुलैपर्यंत पूर्ण करण्यात यावी. त्यानंतर जी पदे रिक्त राहतील, केवळ अशा पदावरच विशेष कारणास्तवच बदल्या १ ते १४ आॅगस्ट या कालावधीपर्यंत करता येतील. जे पद रिक्त नाही अशा पदावरील कार्यरत अधिकारी-सेवकांची अन्यत्र बदली करुन अशा पदावर विशेष कारणास्तव बदली करता येणार नाही.

विशेष कारणास्तव करावयाच्या बदल्या या अधिनियमात कलम ६ मध्ये नमूद केलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांच्या लगतच्या वरिष्ठ प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने करण्यात याव्यात,असे निर्देश शासन परिपत्रकात देण्यात आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com