Video : धरण भरले; पाणीकपातीचे संकट दूर झाले

गंगापूर धरणाचे जलपूजन
Video : धरण भरले; पाणीकपातीचे संकट दूर झाले

नाशिक | प्रतिनिधी Nashik

दोन महिने पावसाची वाट बघावी लागली. त्यामुळे नाशिकवर पुन्हा पाणी कपातीची शक्यता निर्माण झाली होती. गेल्या आठवड्यात वरूनराजाची कृपा झाली म्हणून धरण100% धरण भरले आहे असे प्रतिपादन महापौर सतीश कुलकर्णी यांनी केले....

गंगापूर धरण (Gangapur Dam) शंभर टक्के भरल्यानंतर महापौर सतिश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni) यांच्या हस्ते आज दुपारी जलपूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. गेल्या आठवड्यात नाशिक शहरासह धरण क्षेत्रात संततधार मुसळधार पाऊस झाल्याने धरणांच्या साठ्यामध्ये मोठी वाढ झाली. धरणक्षेत्रातील पाऊस थांबल्यानंतर पूर्णपणे पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे...

अथांग जलाशय आलेल्या गंगापूर धरणाच्या किनारी आज जलपूजन (jalpoojan) संपन्न झाले. धरणांमध्ये अपेक्षित वाढ झाल्याने नाशिक शहराचा पिण्याच्या पाण्याचा आणि जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.जून आणि आॉगस्ट (June & August Month) या तीन महिन्यातही अपेक्षित असा पाऊस न झाल्याने धरणांच्या साठ्यात वाढ होऊ शकली नव्हती.

यामुळे पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण होते की काय अशी भिती निर्माण झाली होती. परंतु, गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. यानंतर महापौर सतीश कुलकर्णी, आयुक्त कैलास जाधव यांच्या हस्ते आज जलपूजनाचा सोहळा पार पडला.

यावेळी आमदार सीमा हिरे यावेळी ताई समितीचे सभापती गणेश गीते सभागृहनेते कमलेश बोडके विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते भाजप गटनेते अरुण पवार शिवसेना गटनेते विलास शिंदे, शंकर पाटील मच्छिंद्र सानप माजी महापौर अशोक मुर्तडक सलीम शेख नगरसेवक हेमंत शेट्टी महापालिकेचे अधिकारी नलावडे साहेब बीबी चव्हाणके यांच्यासह महापालिकेचे अधिकारी नगरसेवक उपस्थित होते

Related Stories

No stories found.