नाशिकच्या 'या' पाच प्रभागात उद्या 'पाणीबाणी'

नाशिकच्या 'या' पाच प्रभागात उद्या 'पाणीबाणी'

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्र येथुन नाशिकरोड विभागातील जलकुंभ भरणारी मुख्य उर्ध्ववाहीनीला गांधीनगर जलशुध्दीकरण केंद्रालगत मोठयाप्रमाणावर गळती सुरु झालेली आहे. यामुळे या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून उद्या (दि २२) रोजी या परिसरात पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे....

महापालिकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड विभागातील

प्रभाग क्र 17- कॅनोल रोड परीसर, नारायण बापू नगर, चंपानगरी, गोदावरी सोसा.,दसकगाव, शिवाजी नगर, एम.एस.सी.बी कॉलनी, तिरुपती नगर, टाकळी रोड परिसर

प्रभाग क्र.18- शिवाजी नगर,मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी , इंगळे चौक, पंचक गांव सायखेडा रोड, भगवा चौक, शिवशक्ती नगर.

प्रभाग क्र.19- गोरेवाडी, प्रभाग क्र.20- पुनारोड परीसर, डावखर वाडी, जयभवानी रोड परीसर, अश्विनी कॉलनी, जेतवन नगर, बिटको कॉलेज तरणतलाव.

प्रभाग क्र.21- जयभवानी रोड परीसर, सहाणे मळा, लवटे नगर 1 व 2, आर्टीलरी सेंटर रोड, दत्तमंदीर रोड, धोंगडे नगर, जगताप मळा, तरण तलाव परीसर, चव्हाण मळा, फर्नाडिस वाडी, भालेराव मळा, जाचक नगर, नंदनवन कॉलनी, आवटे नगर

प्रभाग क्र.22- रोकडोबावाडी, डोबी मळा, सुंदर नगर

या भागात उद्या दुपारी व सांयकाळचा पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. तर परवा म्हणजेच गुरुवारी (दि २३) सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com