Video : एकूणच असा होता शाळेचा पहिला दिवस...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शाळेचा पहिला दिवस नेहमीच स्मरणात राहणारा असाच असतो. (First day in school) करोनाच्या प्रादुर्भावामुळे (Covid pandemic) तब्बल दीड वर्षांनंतर आजपासून (दि ०४) शाळा पूर्ववत झाल्या. विद्यार्थी आले...त्यांचे स्वागतही झाले. मात्र, करोनाचे नियम पाळून...आजपासून ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीचे तर शहरी भागांतील आठवी ते बारावीच्या शाळा सुरु झाल्या...

आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. यावेळी थर्मल चेकिंग (thermal checking), सनिटायझेशन (Sanitation), सोशल डिस्टंगसिंग(Social Distancing) पाळत विद्यार्थ्याना शाळेत प्रवेश देण्यात आला.

पहिल्या दिवशी मुलांच्या स्वागतासाठी शिक्षणोत्सव साजरा करण्याची सूचना शालेय शिक्षण विभागाने शाळांना केली होती . त्यानुसार इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर आज शाळा सुरू झाल्यावर विद्यार्थ्याना पुन्हा शाळेच्या वातावरणात सामावून घेतांना विशेष उपक्रम शाळांकडून राबवण्यात आले.कुठे गुलाब फुल देवुन , कुठे पेढे वाटून, मुलांचं औक्षण करून, वर्गात प्रवेश करण्याच्या मार्गात सुबक अशी रांगोळी काढून यावेळी विद्यार्थ्यांचे अतिशय कौतुकाने स्वागत केले गेले.

Video : एकूणच असा होता शाळेचा पहिला दिवस...
पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरु

गेले दीड वर्ष मुलांचे शाळाविश्व ठप्प झाले होते. शाळा ऑनलाइन सुरू (online school) असल्या तरी या रोजच्या दिनक्रमापासून, शाळेच्या उत्साही वातावरणापासून, मित्रमैत्रिणी, शिक्षक यांच्यापासून विद्यार्थी दुरावले होते. परंतु, आता दररोज मित्र मैत्रिणी भेटणार आहेत, शिक्षकांनाही गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांची प्रतीक्षा होती. त्यामुळे शिक्षकही कमालीचे खुश दिसून आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com