Video : रेडक्रॉस सिग्नलनजीक आग; दोन अग्निशमन बंब दाखल

Video : रेडक्रॉस सिग्नलनजीक आग; दोन अग्निशमन बंब दाखल

नाशिक | प्रतिनिधी Fire

रेडक्रॉस सिग्नलनजीक एका दुकानाला अचानक आग लागल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. आगीचे लोळ बाहेर येऊ लागताच महापालिकेच्या अग्निशमन विभागास (NMC Fire department) याबाबतचा कॉल गेला. यानंतर घटनास्थळी दोन अग्निशमन बंब दाखल झाले असून आग विझवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत....

नाशिक शहराच्या मध्यवर्ती असलेल्या रेड क्रॉस सिग्नलनजीक (Red Cross Signal) सरस्वती विद्यालयायाची इमारत आहे. येथीलच राहुल ट्रेडर्स नामक दुकानाला अचानक आग लागल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली.

घटनास्थळी आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पावसामुळे डीपीवर अचानक शॉर्ट सर्किट झाले, यानंतर विजेचा दाब वाढल्याने दुकानातील उपकरणे जळून आगीचा भडका उडाल्याची माहिती येथील दुकानदाराने देशदूतशी बोलताना दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com