नाशिकरोड | प्रतिनिधी

नाशिक रोड येथील सुभाष रोड परिसरात असलेल्या झोपडपट्टीला आज दुपारी अचानक पणे आग लागली...

या आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. यादीमध्ये सुमारे पाच ते सहा झोपड्या जळून खाक झाल्या.

आग विजवण्यासाठी अग्निशामक दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. यानंतर युद्धपातळीवर आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु होते.

अखेर तासाभराने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या आगीत जवळपास पाच ते सहा झोपड्या जवळून राख झाल्या आहेत.

सुदैवाने या आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त झाली आहे.