Video : चांदोरी चौफुलीवर चक्का जाम; किसान सभा, छावा क्रांतीवीरकडून आंदोलन

Video : चांदोरी चौफुलीवर चक्का जाम; किसान सभा, छावा क्रांतीवीरकडून आंदोलन

चांदोरी/नाशिक | प्रतिनिधी

शेतकरी विरोधी कायद्यांविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या वतीने देशभर चक्का जाम करण्याची हाक देण्यात आली होती. यानंतर राज्यभरातून ठिकठिकाणी या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी चक्क जाम आंदोलन करण्यात आले.

छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक करण गायकर, किसान सभेचे राज्य सचिव कॉम्रेड राजू देसले, शिवाजी राजे मोरे प्रदेश महासचिव छावा क्रांतिवीर सेना, यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले.

सकाळी १० वा च्या सुमारास निफाड तालुक्यातील चांदोरी चौफुलीवर चक्का जाम आंदोलन करून नाशिक औरंगाबाद महामार्ग कार्यकर्त्यांनी रोखून धरला होता. आंदोलनामुळे काही काळ याठिकाणी वाहतूक कोंडी बघयला मिळाली.

दिल्ली येथे सुरू असलेले शेतकरी आंदोलन मोडून काढण्यासाठी केंद्र सरकार अमानुष दडपशाही करत आहे. सरकारने आंदोलन चालू असलेल्या मुख्य चारही स्थळांवर प्रचंड पोलीस बळ तैनात केले आहे. आंदोलकांची रसद तोडण्यासाठी पाणी, वीज, अन्न पदार्थ यांचा पुरवठा पोलीस बळाचा वापर करत तोडण्यात आला आहे. आंदोलन स्थळावरील सत्य जगाला कळू नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

शेकडो शेतकऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पत्रकारांवर केसेस दाखल केल्या जात आहेत. काही पत्रकारांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे. शेतकरी नेत्यांवर खटले भरण्यात आले आहेत.

आंदोलन स्थळांवर येण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना ठिकठिकाणी अडविण्यात येत आहे. रेल्वे नियोजित मार्गावरून इतरत्र वळविण्यात आल्या आहेत. शेतकरी आंदोलकांना अन्न कोठून येते याचा शोध घेऊन तो पुरवठादेखील खंडित केला जात आहे.

काही पक्षाचे कार्यकर्ते स्थानिक नागरिक असल्याचे भासवत पोलिसांच्या मदतीने आंदोलक शेतकऱ्यांवर दगडफेक करत आहेत.

सरकार करत असलेली ही दडपशाही अत्यंत निंदनीय आहे. सरकारच्या या दडपशाहीचा तीव्र शब्दात धिक्कार आहे.

सरकारच्या दडपशाहीचा धिक्कार करण्यासाठी व अन्यायकारक असे तीन शेजारी कायदे रद्द करून आधारभावाचा कायदा मंजूर करून घेण्याच्या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने दिनांक ६ फेब्रुवारी २०२१ रोजी देशभर रास्ता रोको व चक्काजाम करण्याचे आवाहन केले होते.

त्यानुसार निफाड तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले. महिला आणि वारकरी संप्रदाय ने भजन करून शेतकरी आंदोलनात भागीदारी केली. आंदोलना मध्ये नरेंद्र मोदी,किसान विरोधी,शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, दिल्ली के किसान के सन्मान मे हम उतरे मैदान मे आदि घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनात करण गायकर, राजू देसले,शिवाजी मोरे,शिवा तेलंग,उमेश शिंदे, संतोष माळोदे, नवनाथ शिंदे, ज्ञानेश्वर थोरात, वंदना कोल्हे, जिल्हाध्यक्ष विजय खर्जुल, आशिष हिरे,किरण बोरसे,उत्तम कापसे,अविनाश गायकर,मनोहर मुसळे,सागर पवार,सुषमा बोरसे,निफाड तालुका अध्यक्ष सतीश नवले, सागर शेजवळ,योगेश पाटील, कुंदन हिरे,अनील भोर, देवराम आप्पा निकम, बाबा खालकर,गाडे सर,अनिल गडाख, रोशन टरले,आकाश टरले,सचिन हाडोळे, ओमकार टरले, विकास गुळवे,ओमकार झेंडफळे,प्रवीण घोडे,दीपक इकडे,चेतन महाराज नागरे,अभि टरले, प्रज्वल शेटे,प्रकाश गडाख अभिषेक शिंदे , आकाश हिरे, भीमाची गडाख,भास्करराव गायके, किसान सभेचे शिवराम रसाळ, शिवाजी मोगल, भाऊसाहेब शिंदे, शिंदे शिवाजी, जाधव विष्णू, लक्ष्मण काळे, प्रकाश जाधव, आदी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com