Video : फॅक्ट चेक : लसीकरणाचा आणि 'त्या' चुंबकीय शक्तीचा काहीएक संबंध नाही

Video : फॅक्ट चेक : लसीकरणाचा आणि 'त्या' चुंबकीय शक्तीचा काहीएक संबंध नाही

नवीन नाशिक | प्रतिनिधी

शिवाजी चौक येथील समोसा व्यावसायिकाने करोनाची लस घेतल्यानंतर त्यांच्या शरीरात चुंबकीय शक्ती आल्याचा अजबच प्रकार कालपासून समाजमाध्यमांत व्हायरल झाला होता. या चुंबकीय शक्तीशी निगडीत अनेक बातम्यादेखील प्रसिद्ध झाल्या. यानंतर या प्रकरणाचा उलगडा करण्याचा दैनिक देशदूतने प्रयत्न केला. यादरम्यान, तज्ञांनी या चुंबकीय शक्तीचा आणि लसीकरणाचा काहीएक संबंध नसल्याचे स्पष्ट केले. तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात यांनीदेखील याबाबतचा अहवाल पाठवणार असल्याचे संगितले आहे...

देशभरात लसीकरणाविषयी अनेक समज गैरसमज पसरवले जात आहे. अनेक ठिकाणी करोना लसीकरणासाठी जनजागृती केली जात असताना नाशिकमधील चुंबकीय शक्तीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडीओ नंतर लसीकरण करू पाहणाऱ्या नागरिकांची घालमेल झाली होती. त्यामुळे या प्रकरणाची फॅक्ट चेक करण्याचा देशदूतने प्रयत्न केला.

सुरुवातीला दैनिक देशदूतचे प्रतिनिधी नवीन नाशकातील शिवाय चौक शॉपिंग सेंटर येथील अरविंद जगन्नाथ सोनार ( वय 71 ) यांच्या घरी पोहोचले. चुंबकीय शक्तीबाबतचा हा प्रकार त्यांनी बघितला.

त्यांनतर याठिकाणी काही अंधश्रद्धा निर्मुलनचे कार्यकर्तेदेखील पोहोचले होते. त्यांच्याशीदेखील देशदूतने संवाद साधला. यादरम्यान, कुठलीही दैवी शक्ती, चमत्कार नसल्याचे त्यन्नी सांगितले. यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्याशीही आमच्या प्रतिनिधीने चर्चा केली. ते म्हणाले, असा प्रकार आपण पहिल्यांदाच पहिला आहे.

लसीकरण आणि चुंबकीय शक्ती याचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या संपूर्ण प्रकारचा शोध घेणार आहे. तसेच याबाबतचा अहवालदेखील आपण पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

'दैनिक देशदूत'ने वाचकांचा संभ्रम उडू नये तसेच विश्वासहर्ता कायम रहावी याकरिता या प्रकरणाच्या सखोल मध्ये जाऊन विविध जाणकारांशी व तज्ञांशी चर्चा करूनच हे वृत्त प्रसारित केले आहे, जेणेकरून लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये कुठलेही गैरसमज पसरू नये. हा यामागचा मूळ उद्देश होता.

कुठल्याही लसीकरणाने मानवी शरीरामध्ये चुंबकीय शक्ती येत नाही चुंबकीय शक्ती का आली यासाठी इतर चाचण्या करण्याची गरज आहे यामुळे लसीकरणासाठी नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसून जर कुणाच्या शरीरात अशी चुंबकीय शक्ती आल्यास जास्त ची पट्टी हातात ठेवल्यास ती चुंबकीय शक्ती निघून जाते नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

डॉ. प्रभाकर महाजन, मॅग्नेटोथेरपिस्ट

सोनार यांची प्रशासनातर्फे तात्काळ वैद्यकीय चाचणी करून त्याबाबतचा निकाल लवकरात लवकर द्यावा. लसीकरणाचा या प्रकरणाची काही संबंध नसून ही कुठली दैवीशक्ती किंवा चमत्कार किंवा अंधश्रद्धा नाही नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.

डॉ. ठकसेन गोराणे, राज्य सरचिटणीस अंधश्रद्धा निर्मूलन समिती

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com