गावात पक्कं हादरं बसतंय, मनात धाकधूक हुयते; सुरगाणा तालुक्यात भूकंपसदृश्य हादरे

गावात पक्कं हादरं बसतंय, मनात धाकधूक हुयते; सुरगाणा तालुक्यात भूकंपसदृश्य हादरे

सुरगाणा |प्रतिनिधी Nashik

तालुक्यातील अंबोडे जवळील खोकरविहर, चिंचपाडा, खोकरविहीर, चि-याचापाडा या गावात चार ते पाच दिवसांपासून भूकंप सदृश हादरे बसत असल्याचा दावा येथील नागरिकांनी केला आहे. गुरुवारी (दि २१) रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान स्फोटाचा आवाज होतो तसा मोठा आवाज झाला होता. तर संध्याकाळी आठच्या सुमारास मांडणी वरील ठेवलेल्या भांड्याचा आवाज आल्याने नागरिकांमध्ये भूकंपाचे हादरे तर नाही ना अशी उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे....

काही वेळा कौलांचा आवाज येतो. याबाबत ग्रामस्थ एकनाथ गांगोडे यांनी देशदूतशी बोलतांना सांगितले की, असे आवाज नेहमीच गावात येतात. आठ दिवसांपूर्वी १२ ऑक्टोबर रोजी रात्री ९.१५ वाजता असाच आवाज आला होता. त्यावेळी घर हलल्यासारखा सारखा भास झाला होता. तर १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता भांड्याचा आवाज ऐकू आला होता.

२२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.५५ वाजता सौम्य धक्का बसला. दुसरा १.३० वाजता तर ६.४८ वाजता संध्याकाळी जोरात आवाज झाला असल्याचे एकनाथ बा-हे यांनी सांगितले.

तसेच दोन वर्षांपूर्वी गावापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर चामोलीचा माळ येथील जमीनीला दोनशे ते अडीचशे फुटा पर्यंत उभी भेग( चीर) पडून जमीन खचली होती. याबाबत नेमके काय हा प्रकार आहे याबाबत चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी एकनाथ गांगोडे, देविदास पाडवी, निवृती बा-हे, नामदेव जाधव, गंगाराम बा-हे, गंगाराम गांगोडे , मधुकर वार्डे, एकनाथ बा-हे, जानकी बा-हे, योगीराज गवळी, यांनी केली आहे. याबाबत नैसर्गिक आपत्ती विभागाला निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अनेक वेळा असे आवाज येत असतात. आज झालेल्या आवाजाची तीव्रता अधिक जाणवली. बार झाल्यासारखा आवाज येतो. आता तर कुठेही विहिरीचे काम सुरु नाही. भांड्याचा आवाज येतो. जमीनीतून आवाज आल्याचे जाणवते.अचानक आवाज झाला तर माणूस दचकून उठतो. बाहेर निघून बघितले तर काहींच दिसत नाही. याचा नाद प्रतिध्वनी दवाखान्यात घुमतो. याबाबत ग्रामस्थ सकाळी एकमेकांशी चर्चा करत असतात. यानंतर नेहमीप्रमाणे कामाला लागतात. मात्र नेमका हा आवाज का येतो याबाबतची शहानिशा करून आमची भीती शासनाने दुर करावी.

एकनाथ गांगोडे, ग्रामस्थ खोकरविहीर खोकरविहिर,चि-याचापाडा

चिंचपाडा या गावात ता. २१/१०/२०२१ रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान जोरात आवाज आला तर संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास घरात ठेवलेल्या भांड्याचा आपोआप आवाज झाला. हे भूकंपाचे हादरे असावे असे ग्रामस्थांनी सांगितले. काल झालेल्या आवाजाची तीव्रता अधिक जाणवली. अचानक हा आवाज का येतो याबाबतची शहानिशा करून आमची भीती शासनाने दुर करावी अशी ग्रामस्थांनी मागणी आहे. तहसिल कार्यालयात आज अहवाल सादर केला आहे.

ज्ञानेश्वर पगार. तलाठी खोकरविहीर

खोकरविहीर परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जिवित हानी झालेली नाही. याबाबत भूकंप मापक यंत्रणा मेरी नाशिक तसेच नैसर्गिक आपत्ती कक्ष मा. जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक या प्रशासनाशी संपर्क केला आहे. शासन तुमच्या पाठीशी सदैव आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. याबाबत लवकरच भूकंप मापक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल.

राजेंद्र मोरे.तहसिलदार सुरगाणा

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com