Video : नाशिकच्या पोलीस उपअधीक्षकांचा परमवीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप; वाचा सविस्तर

Video : नाशिकच्या पोलीस उपअधीक्षकांचा
परमवीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप; वाचा सविस्तर

नाशिक। प्रतिनिधी

वादाच्या भोवर्‍यात सापडलेले सध्याचे निलंबित मुंबईचे पोलीस आयुक्त तर तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या बेकायदेशीर कामात ढवळाढवळ केली. तसेच ते सांगतील तसे काम केले नाही म्हणुन एका महिला हवालदारच्या आत्महत्या प्रकरणात आपणास अडकवल्याचा आरोप नाशिक ग्रामिण पोलीस दलात कार्यरत असलेले उपअधिक्षक शामकुमार निपुंगे यांनी केले आहेत...

आज रात्री ते प्रसिद्ध माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, जुन 2016 ते ऑगस्ट 2017 दरम्यान ते भिवंडी येथील वाहतुक शाखेत सहायक पोलीस आयुक्त म्हणुन कार्यरत होते.

यावेळी भिवंडी वाहतुक शाखेअंतर्गत येत असलेल्या नारपोली वाहतुक विभागात तेथील पोलीस निरिक्षकाने सिंग यांच्याशी मोठी आर्थिक देवाण करून नियुक्ती घेतली होती.

ते आपण सहायक आयुक्त असतानाही कोणतेही आदेश पाळत नसत. तसेच मोठे आर्थिक गैरव्यवहार, वाहन मालक तसेच गुदाम मालकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करत होते. यात आपण हस्तक्षेप केल्याचा त्यांना राग होता.

या दरम्यान, सुभद्रा पवार या महिला हवालदारने आत्महत्या केली होती. तीने काही दिवसांपुर्वी आपल्याशी कामानिमित्त तसेच वैयक्तिक अडचणींबाबात मोबाईलद्वारे संभाषण केले होते.

तसेच ती वाहतुक शाखेत होती. हा धागा पकडत तीच्या आत्महत्येत माझे नाव अडकवले. वास्तविक पवार हिची आत्महत्या नव्हे तर संशयास्पद खून झाल्याचे स्पष्ट असतानाही केवळ परमविर सिंग यांच्या सांगण्यावरून आपणास अडकवले असल्याचे आरोप त्यांनी केले आहेत.

याबाबतचे अर्ज त्यांनी आडगाव पोलीस ठाणे तसेच पोलीस आयुक्तांना दिले आहेत. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com