एस. टी. कामगारांचे निलंबन रद्द करा; केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार

एस. टी. कामगारांचे निलंबन रद्द करा; केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार
डॉ भारती पवार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सध्या एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात संप सुरू आहे. आपल्या न्याय हक्कासाठी एस.टी. कर्मचारी शांततेत संपात  सहभागी आहेत. परंतु, राज्य सरकारने काही एस.टी. कर्मचाऱ्यांना  संपात सहभागी झाल्याच्या कारणावरून निलंबित केले आहे.  हे निलंबन एस.टी. कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक कारक ते त्वरित रद्द करावे अशी मागणी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केली आहे...

कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्यांचा विचार करत त्यांच्याशी संवाद साधून यावर तोडगा काढणे गरजेचे आहे.

त्यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई रद्द करावी. अशी मागणी ना.डॉ. पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com