आमच्या आयुष्याच्या सायंकाळी 'अच्छे दिन' आणा

आमच्या आयुष्याच्या सायंकाळी 'अच्छे दिन' आणा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद प्रशासनाने (Zilla Parishad Nashik) सेवानिवृत्तांच्या मागण्या मान्य करून आमच्या आयुष्याच्या सायंकाळी "अच्छे दिन' आणावेत, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त सेवकांनी प्रशासनाकडे केली...

नाशिक जिल्हा परिषदेमार्फत मंगळवारी (दि.१२) पेंशन अदालत घेण्यात आली. यावेळी सेवानिवृत्त सेवकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (deputy chief executive officer) यांना दिले. जि.प. निवृत्त सेवकांना निवृत्तीवेतन एक तारखेला मिळावे, सेवानिवृत्त शिक्षकांना निवड श्रेणीचा लाभ लवकर मिळावा, जुलैची वेतनवाढ मिळावी आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.

यावेळी नाशिक जिल्हा पेंशनर्स असोसिएशनचे (District pensioners association) अध्यक्ष, सचिव कार्यकारिणीचे पदाधिकारी व सदस्य यांनी सहभाग घेऊन उप मुख्य कार्यकारी अधिकारी पिंगळे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक राजीव म्हसकर ), मुख्य लेखा व वित्त अधिकारी बच्छाव यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान सर्व मागण्यांना न्याय दिला जाईल असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

Related Stories

No stories found.