Video : हौसेला मोल नाही; अलिशान गाडीत नव्हे तर 'हेलीकॉप्टर'ने आला 'नवरदेव'

Video : हौसेला मोल नाही; अलिशान गाडीत नव्हे तर 'हेलीकॉप्टर'ने आला 'नवरदेव'

नाशिक | प्रतिनिधी Nashik

करोना (Corona Outbreak) काळापासून लग्न अगदी साध्या आणि मर्यादित पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. मात्र, म्हटले जाते ना हौसेला किंमत नाही अगदी तसाच प्रत्यय नुकताच नाशिकमध्ये आला....

नाशिक मधील एका वधुपित्याने जावयाला आणण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरच पाठवले. यामुळे या हौशी शेतकऱ्याची जिल्ह्यात सर्वदूर चर्चा आहे.

नाशिक जिल्ह्यातील ढकांबे (Dhakambe) येथील प्रगतिशील शेतकरी गोपीनाथ बोडके (Farmer Gopinath bodake) यांची एकुलती एक उच्चशिक्षित कन्या वैष्णवी हिचा विवाह पिंपळगाव बहुला येथील शांताराम नागरे यांचा उच्चशिक्षित मुलगा संकेत यांच्यासोबत नुकताच झाला.

पिंपळगाव बहुलापासून बालाजी लॉन्सपर्यंतचे अवघे पाच-सात किलोमीटरवर अंतर पार करण्यासाठी सासऱ्यांनी लाडक्या जावयासाठी चक्क हेलिकॉप्टर पाठवले होते.

...करून दाखवलं

प्रत्येक मुलीच्या वडिलांची इच्छा असते आपल्या मुलीचे लग्न थाटात व्हावे. माझीसुद्धा अशीच इच्छा होती. त्यामुळे लाडक्या कन्येचे लग्न काही तरी वेगळ्या स्वरूपात करायचे ठरवले आणि करूनच दाखवले.

- गोपीनाथ बोडके, मुलीचे वडील

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com