भऊर उपसरपंचपदी योगिता पवार

भऊर उपसरपंचपदी योगिता पवार

देवळा | विशेष प्रतिनिधी

तालुक्यातील भऊर येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगिता पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच दादा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली...

सविता पवार यांनी आवर्तनानुसार राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निर्धारित वेळेत योगिता पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ गावित यांनी केली.

बैठकीस ग्रामपंचायत सदस्य शोभा पवार, सविता पवार, राजाराम मोरे, बाळू गरुड, बाजीराव मोरे, सुरेश माळी, मनीषा माळी, सुनंदा शिंदे, चित्रा मोरे तसेच अमोल पवार, दीपक पवार, विलास पवार, दिनेश पवार, केदा पवार, बापू गरुड, साहेबराव माळी, गायत्री पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com