मराठा आरक्षणासाठी नाशकात अजित पवारांना दाखवले काळे झेंडे

संभाजी बिग्रेडचे कार्यकर्ते ताब्यात
मराठा आरक्षणासाठी नाशकात अजित पवारांना दाखवले काळे झेंडे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना आज मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) संभाजी बिग्रेडकडून काळे झेंडे दाखविण्यात आले. कार्यकर्ते घोषणाबाजी करू लागल्यानंतर तात्काळ पोलिसांनी या कार्यकर्त्याना अजित पवार यांचा ताफा येण्याआधीच ताब्यात घेत वाट मोकळी करून दिली...

अशोक स्तंभ (Ashok Stambh) चौकात हा प्रकार घडला. अजित पवारांविरोधात आंदोलन करणाऱ्या मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

मराठा कार्यकर्ते अजित पवारांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न करणार होते. मात्र पोलिसांनी ताफा येण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याने दौऱ्याला गालबोट लागले नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com