देवळा | विशेष प्रतिनिधी

देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित जिजामाता कन्या विद्यालय देवळा येथील कलाशिक्षक भारत पवार यांच्या फलक चित्रांना कला अध्यापनाच्या "आर्ट एक्सप्रेशन" या पुस्तकात स्थान मिळाले आहे.

लेखक व कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य जयप्रकाश जगताप यांच्या कला अध्यापन इंग्रजी आणि मराठी माध्यमातील ए.टी.डी.,ए.एम., जी.डी.आर्ट या कलेतील उच्च शिक्षण कोर्सच्या पुस्तकात पवार यांनी रेखाटलेली फलक चित्रे छापण्यात आली आहेत.

जे.जे.आर्ट बुक सिरीजचे हे २८ वे पुस्तक असून "आर्ट एक्सप्रेशन" या नावाने पुण्यामध्ये प्रकाशित झाले आहे.

कलाशिक्षक भारत पवार हे प्रत्येक दिनविशेषला अनुसरून विद्यार्थ्यांना सचित्र माहीत व्हावेत म्हणून विविध दिनविशेष खडूद्वारे फलक रेखाटन करीत असतात. पवार यांना जिल्ह्यास्तरीय, राज्यस्तरीय विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

पवार यांच्या फलक चित्रांची लेखक जयप्रकाश जगताप यांनी दखल घेऊन ती त्यांच्या पुस्तकात छापली याचा त्यांना विशेष आनंद होत असून हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

त्यांच्या या सन्मानाचे देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्राचार्य हितेंद्र आहेर, व्हा.चेअरमन आक्कासाहेब आहेर, सचिव गंगाधरमामा शिरसाठ, उपपप्राचार्या डॉ. सौ. मालतीताई आहेर, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव , केंद्रप्रमुख रावबा मोरे, मुख्याध्यापिका रंजना मोरे, मुख्याध्यापक दिलीप आहेर, पर्यवेक्षक ठोके, आहेर सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षेकेतर कर्मचारी, परिसरातील नागरिक विद्यार्थी ,पालकवर्ग यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.