...म्हणून कर्मचाऱ्यांकडून नोटप्रेसच्या जनरल मॅनेजर यांना घेराव

...म्हणून कर्मचाऱ्यांकडून नोटप्रेसच्या जनरल मॅनेजर यांना घेराव
file photo

नाशिकरोड | प्रतिनिधी

नाशिकरोडच्या नोट प्रेसमधील (Currency Note Press) पाच लाखांच्या नोटांचा छडा पोलिसांनी लावला आहे. कामगार दोषी नसल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नऊ जणांवरील कारवाई मागे घ्यावी, अशी मागणी करत प्रेस मजदूर संघाच्या पदाधिकारी (Currency note press union) व कामगारांनी जनरल मॅनेजर महापात्रा (Genral Manager) यांना आज घेराव घातला. महापात्रा यांनी तातडीने दिल्लीतील प्रेस महामंडळाच्या (Delhi press corporation) वरिष्ठांशी संवाद साधला. यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले...

प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांच्या नेतृत्वाखाली राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, प्रविण बनसोडे, जयराम कोठुळे, अशोक जाधव, शिवाजी कदम, रमेश खुळे, राजू जगताप, इरफान शेख, अविनाश देवरूखकर आदींनी सोमेश्वर महापात्रांना घेराव घातला. नोट गहाळ प्रकरणातील दोषी सुपरवायझरनी कृत्याचा कबुलीजबाब (Supervisor Note) व्यवस्थापनाला लिहून दिला आहे.

कामाच्या ताणामुळे (Overtime Working) चांगल्या नोटा चुकून पंचिग (बाद) केल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे. घाबरल्यामुळे आपण ही बाब लपवून ठेवल्याचे त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनीही आपला अहवाल सादर केला आहे.

संबंधित सुपरवायझरांना निलंबित (Suspension of the supervisor) करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणातील निर्दोष नऊ जणांवरील कारवाई (Action Against nine employees) मागे घ्यावी, अशी मागणी कामगार नेते व कामगारांनी केली. तशा मागणीचे पत्र महापात्रा यांना देण्यात आले. महापात्रांनी दिल्लीतील वरिष्ठांशी बोलणी केली. कारवाई मागे घेण्याच्या प्रोसेसला वेळ लागणार आहे.

दरम्यान, निर्दोष कामगारांवरील कारवाई मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया लांबलचक आहे. त्यामुळे कामगारांनी संयम ठेवावा, अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी केले. प्रेस मजदूर संघ कायम कामगारांच्या पाठीशी ठाम उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com