ऑक्सिजन गळतीनंतर अनेक रुग्णांना इतरत्र हलवले; ११ रुग्ण दगावल्याची भीती

ऑक्सिजन गळतीनंतर अनेक रुग्णांना इतरत्र हलवले; ११ रुग्ण दगावल्याची भीती

नाशिक | प्रतिनिधी

ऑक्सिजन गळतीनंतर प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांना मिळेल त्या वाहनाने हलविण्याचे काम झाकीर हुसेन रुग्णालयाकडून घेण्यात आले होते...

Title Name
Video : ऑक्सिजन टाकीत भरत असताना झाला लिक
ऑक्सिजन गळतीनंतर अनेक रुग्णांना इतरत्र हलवले; ११ रुग्ण दगावल्याची भीती

नाशिक महानगर पालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात १७० पेक्षा अधिक रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. तर ६० ते ७० रुग्ण व्हेंटिलेटर आहेत. दवाखान्याच्या आवारातच ऑक्सिजन लिकेजची घटना घडल्यामुळे जवळपास ११ रुग्ण दगावल्याची प्राथमिक चर्चा आवारात आहे. तसेच ३० पेक्षा अधिक रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत असल्याचेही समजते आहे...

ऑक्सिजन गळतीमुळे रुग्णालयातील अनेक रुग्णांना तात्काळ इतरत्र हलवण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती. मात्र, अनेक रुग्ण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर असल्यामुळे प्रकृती चिंताजनक झाली होती.

ऑक्सिजन ,मोठ्या टाकीतून गळती होताना परिसरात पांढऱ्या रंगाचा वायू सर्वदूर पसरला होता. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तात्काळ याठिकाणी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला.

मागच्या काही दिवसांंपूर्वीच रुग्णालयात ऑक्सिजन टाकी बसवण्यात आली आहे. तसेच रुग्णसंख्या वाढल्यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना गेल्या काही दिवसांपूर्वी प्रशिक्षण देण्यात आल्याचे समजते. तसेच याठिकाणी मॉकड्रीलदेखील पार पडले असल्याचे समजते. यादरम्यान, आज एवढी मोठी घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एकूण ११ रुग्णांचा या घटनेत मृत्यू झाल्याची चर्चा आहे. तर ३० रुग्ण अत्यवस्थ अवस्थेत असल्याचे समजते. एकीकडे करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे एवढी मोठी दुर्घटना नाशकात घडल्यामुळे नाशिकची परिस्थिती आणखीनच नाजूक झाली आहे.

जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणार

नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची घटना घडल्यानंतर याठिकाणी ११ रुग्णांचे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यादरम्यान, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी जबाबदार असलेल्यावर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया वृत्तवाहिनीला दिली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com