पाच वर्षीय बालकावर अनैसर्गिक कृत्य; सटाण्यातील संतापजनक प्रकार

पाच वर्षीय बालकावर अनैसर्गिक कृत्य; सटाण्यातील संतापजनक प्रकार

सटाणा | तालुका प्रतिनिधी

शहरालगत सुकडनाला येथिल झोपडपट्टी परिसरात पाच वर्षीय बालकावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या युवकावर सटाणा पोलिस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पो.नि. नंदकुमार गायकवाड यांनी दिली...

सटाणा-ताहाराबाद रस्त्यालगत असलेल्या सुकडनाला परिसरात रविवार दि. २० सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सोपान सूर्या मोरे ( वय- 20 ) या युवकाने पाच वर्षीय बालकावर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला.

याबाबत मुलाच्या आईने दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, संबधित संशयितावर भादवी 377 सह पोक्सो कायद्यान्यवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि वर्षा जाधव करीत आहेत.

लहान बालकावर झालेल्या अनैसर्गिक कृत्याच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांतर्फे तीव्र संतप्त प्रीतिक्रिया उमटल्या असून, संबंधिताचा शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com