दिंडोरीत करोना योद्ध्यांची दिवाळी अंधारात

दिंडोरीत करोना योद्ध्यांची दिवाळी अंधारात

दिंंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी नगरपंचायत सफाई कर्मचार्‍यांना बोनस व अग्रिम रक्कम न मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. खिशात पैसे नसल्याने यंदा नगर पंचायत कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार असल्याचे चित्र सध्यातरी दिसून आले आहे...

शासनाने कर्मचार्‍यांना बोनस द्यावा व कर्मचार्‍यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी कर्मचार्‍यांनी केली आहे.

दिंडोरी नगरपंचायतीत असलेल्या कर्मचार्‍यांना नगरपंचायतीने दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर बोनस द्यावा, अशी अपेक्षा होती. मागील दोन वर्षापासून नगरपंचायत कर्मचारी करोना काळात दिंडोरीकरांच्या सेवेत राहिले.

महिला कर्मचारी जिवाची पर्वा न करता काम करीत राहिल्या. कर्मचार्‍यांना नुकतेच सिटू संघटना,डॉक्टर कराड,रामदास चारोस्कर,सुनील आव्हाड,नितीन गांगुर्डे आदीच्या पाठपुराव्याने किेमान वेतन लागू करण्यात आले आहे.

परंतू अद्यापपर्यंत त्यांना लाभ मिळालेला नाही.दिवाळीत बोनस मिळण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती.पण अग्रिम पगार ही देण्यात आला नाही. या पार्श्‍वभूमीवर कर्मचार्‍यांनी तक्रारीचा पाढा वाचला.

कर्मचाऱ्यांना हातमोजे दिले जात नाही.साधे झाडू सुद्धा दिले जात नाही.ठेकेदारांचे पैसे मिळतात पण कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नसल्याचे संघटनेने सांगितले.कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भरत कापसे यांनी प्रशासनाचा निषेध केला.

माकप युवा संघटनेचे अध्यक्ष आप्पा वाटाणे यांनी कामगारांना न्याय देण्याची मागणी केली.याबाबत नगरपंचायत प्रशासनाकडे मागणी केली होती.

तरी सुध्दा बोनस न मिळाल्याने सफाई कर्मचार्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.पुढील काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारत कापसे, आप्पा वाटाणे आदींनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com