नगरमधील वाढलेली करोनाची रुग्णसंख्या नाशिकसाठी ठरतेय डोकेदुखी

नगरमधील वाढलेली करोनाची रुग्णसंख्या नाशिकसाठी ठरतेय डोकेदुखी
करोनाबाधित रुग्णसंख्या

नांदूरशिंगोटे | वार्ताहर Nashik

अहमदनगर (Ahemadnagar) जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) तालुक्यात करोनाची वाढती रुग्णसंख्या नाशिकसाठी डोकेदुखी ठरली आहे. एकीकडे जिल्ह्यातील सिन्नर (Sinnar) आणि निफाड (Niphad) तालुक्यात सर्वाधिक करोनाचे रुग्ण उपचार घेत असताना जिल्ह्याच्या वेशीवरील गावांना करोनाचा धोका असल्याने जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) यांच्यासह अधिकाऱ्यांच्या या गावात चकरा वाढल्या आहेत...

नाशिकच्या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील गावांना डोकेदुखी ठरत असून, त्याचे लोन नाशिक (Nashik) जिल्ह्यात वाढण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नांदूरशिंगोटे (Nandurshingote) येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी स्थानिक, तालुकास्तरीय तसेच आरोग्य, महसूल ,व पोलिस प्रशासनाने कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी करून नागरिकांना सतर्क राहण्यास प्रवृत्त करावे अशा सूचना दिल्या...

यावेळी त्यांनी संगमनेर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोणा रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. नगर जिल्ह्यातील तब्बल ६० हून अधिक गावे लाॅक डाऊन केले आहेत.

सर्वत्र बंदची स्थिती असल्याने या गावातील नागरिक, शेतकरी सिन्नर तालुक्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या गावात वेगवेगळ्या खरेदी-विक्रीसाठी येत असल्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील आवारात जिल्हाधिकारी मांढरे यांनी अचानक भेट देऊन कोरोना प्रतिबंधक उपाय योजनांची अंमलबजावणी होत नसल्याने नाराजी व्यक्त केली. यापुढे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. त्याच प्रमाणे हॉटेल व्यवसायिक आणि इतर व्यवसायिकांनीही सॅनिटायझर व मास्कचा वापर सक्तीने करावा असे आवाहन केले.

सिन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात जवळपास २०० कोरोना बाधित रुग्ण संख्या असल्याने प्रशासनाची चिंता वाढत आहे. ही रुग्ण संख्या वाढू नये या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी येथील ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठक घेऊन कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे ,डॉ.लहू पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, दशरथ चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते, भुमिअभिलेख चे सचिन चव्हाण, सरपंच गोपाळ शेळके, ग्रामसेवक निलेश हासे, दीपक बर्के, संदीप शेळके ,शशिकांत येरेकर, अनिल शेळके, भारत दराडे आदींसह ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.