नाशकात करोनाबाधित घटले मात्र आठ दिवसांत पावणेदोनशे मृत्यू

नाशकात करोनाबाधित घटले मात्र आठ दिवसांत पावणेदोनशे मृत्यू
करोना अपडेट

नाशिक | प्रतिनिधी

कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणल्यानंतर नाशिक शहरातील निर्बंध उठवण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून रोज कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना मृत्यू वाढ आहे. शहरात मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू झालेले असताना आकड्यांची दडवादडवी होत असल्याचे आरोप होत होता. नुकतेच राज्याच्या आरोग्य विभागाचे अपर सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंचे पोर्टलवर अपडेट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर नाशिकमधील मृतांची संख्या वाढत आहे...

करोना अपडेट
जुन्या कोरोना मृतांच्या नोंदीमुळे राज्यात विक्रमी ६६१ जणांचा मृत्यू

जिल्ह्यांच्या आरोग्य यंत्रणेने राज्याच्या आरोग्य खात्याला पाठविलेल्या अहवालात नोंदवलेले मृत्यू आणि राज्याच्या आरोग्य खात्याने दाखविलेल्या मृतांच्या संख्येत तफावत अाहे. विविध जिल्ह्यांतील एकूण मृतांच्या संख्येपेक्षा कमी संख्या राज्याच्या दैनंदिन अहवालात दाखवण्यात आली आहे. यामुळे राज्याचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी खात्यातील अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर याबाबत संदेश पाठविला आहे.

त्यात नोंद नसलेल्या मृतांच्या आकडेवारीबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना 'अलर्ट' केले आहे. संबंधित जिल्ह्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील 'अनरिपोर्टेड डेथ'च्या राहिलेल्या नोंदी १० जूनपर्यंत तत्काळ पोर्टलवर अद्ययावत कराव्यात. काही मृत्यू नोंदी राहिल्यास त्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांवर कारवाई करण्यात येईल,' अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना तंबी दिली आहे.

नाशिक शहरातील मृतांमध्ये झालेली वाढ म्हणजे या राहिलेल्या नोंदी तर नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण कोरोना रुग्ण कमी झाले असताना मृत्यू का वाढत आहे? गेल्या सात दिवसांत जवळपास ३१४ मृत्यू जिल्ह्यात नोंदवले गेले असून यातील १७३ मृत्यू हे नाशिक शहरातील आहेत. एकीकडे बाधित रुग्णांची संख्या घटत असल्याने दिलासा मिळत असताना दुसरीकडे वाढलेले मृत्यूदर धोक्याची घंटा वाजवू लागले आहेत.

चार महिन्यात ९ हजार ११२ मृत्यू

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांनी नुकतीच एक माहिती दिली आहे. यामध्ये नाशिकमध्ये गेल्या चार महिन्यात ९ हजार ११२ मृत्यू झाले आहे. त्यात शहराबरोबरच जिल्हातील व जिल्हयाच्या बाहेरील नोंदविलेले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

नाशिक शहर ग्रामीण व जिल्ह्याबाहेरील ९ हजार ११२ मृत्यूंमध्ये ३ हजार ५५४ महिला व ५ हजार ५५८ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये कोरोना बाधित रूग्णांसह अन्य सर्व कारणाने मयत झालेल्या व्यक्तींचादेखील समावेश आहे.

नाशिक महानगरपालिका हद्दीत जानेवारी ते एप्रिल २०२१ या चार महिन्याच्या कालावधीत नाशिक पूर्व, पश्चिम,पंचवटी,नाशिक रोड, नवीन नाशिक, सातपूर या सहा विभागीय कार्यालयात या मृत्यूंची नोंद असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

मागील आठ दिवसांत झालेली मृतांची वाढ

९ जून २०२१ एकूण मृत्यू ७२ (नाशिक मनपा ४५, मालेगाव मनपा ०४, नाशिक ग्रामीण २३)

८ जून २०२१ एकूण मृत्यू ५७ (नाशिक मनपा ३९, नाशिक ग्रामीण १८)

७ जून २०२१ एकूण मृत्यू ३४ (नाशिक मनपा १२, ग्रामीण 22)

६ जून २०२१ एकूण मृत्यू २३ (नाशिक मनपा ११, ग्रामीण १२)

५ जून २०२१ एकूण मृत्यू ४७ (नाशिक मनपा ३१, ग्रामीण १५, मालेगाव मनपा ०१ )

४ जून २०२१ एकूण मृत्यू ४० (नाशिक मनपा २१, ग्रामीण १७, मालेगाव मनपा ०१, जिल्हाबाह्य०१)

०३ जून २०२१ एकूण मृत्यू ४१ (नाशिक मनपा १४, ग्रामीण २७)

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com