धक्कादायक! कळवण-दिंडोरी रोडवर कोव्हॅक्सिनचे व्हायल सापडल्याने खळबळ

धक्कादायक! कळवण-दिंडोरी रोडवर कोव्हॅक्सिनचे व्हायल सापडल्याने खळबळ

नांदुरी | वार्ताहर Nanduri

कळवण तालुक्यातील आठंबे ते नांदुरी या रस्त्यावर कोव्हॅक्सिन ही लस जवळजवळ 4 ते 5 किलोमीटर अंतरावर पडलेल्या आढळल्याची धक्कादायक घटना घडली आहे...(Nashik to Kalwan Road)

नाशिक येथिल रहिवासी असलेले व कल्पेश विजय जेठार हे त्यांच्या शेतावर गोबापूर येथे आले होते. त्यानंतर ते नाशिककडे जात असतांना त्यांना रस्त्यावर काही कोव्हॅक्सिन (खोके)आढळले.

त्यांनी ते उचलुन बघितले असता कोव्हॅक्सिन असलेल्या लसी आढळल्या असून एकूण 14 लसी आहेत. असुन काही लसीच्या बाटल्या फुटल्या आहेत. गोबापुर येथील आशा सेविका राधा खिल्लारी यांच्याकडे सपुर्द केल्या.

या आशा सेविकेने नांदुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेले आरोग्य सेवक भिष्म पाटील यांच्या ताब्यात दिल्या. तर आरोग्य सेवक पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. निर्मल सिध्दु यांच्या ताब्यात दिल्या.

डॉ. सिध्दु यांनी आशा सेविका राधा खिल्लारी यांच्याशी संपर्क साधत माहिती घेत जिल्हा वैद्यकिय अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. रस्त्यावर पडलेली लस जळगाव जिल्ह्यात जात असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून समजते आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com