समुपदेशनाची हजारी; हेल्मेट वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले

समुपदेशनाची हजारी; हेल्मेट वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले

नाशिक | प्रतिनिधी Nashik

शहरात हेल्मेट (Helmet) वापराबाबत पोलिसांकडून सुरू झालेल्या कारवाईमध्ये (Action Against without helmet users) आतापर्यंत एक हजारपेक्षा अधिक दुचाकीस्वारांचे समुपदेशन करण्यात आले. यात प्रामुख्याने ५२ महिलांचा समावेश आहे. रस्त्यावरील अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा डोक्याला मार लागून मृत्यू होतो. हे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस आयुक्त दीपक पांडे (Police Commissioner Deepak Pandey) यांनी १५ ऑगस्टपासून शहरातील पेट्रोल पंपावर पेट्रोल घेताना हेल्मेट असणे बंधनकारक केले....

या निर्णयाची अंमलबजावणी होत असताना अनेक दुचाकीस्वार पेट्रोल भरताना दुसऱ्याचे तात्पुरत्या स्वरुपात हेल्मेट घेणे, हेल्मेट नसताना बळजबरी करणे असे प्रकार करतात. यामुळे शहर पोलिसांनी रस्त्यावर दुचाकीस्वारांची तपासणी सुरू केली. नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वारांकडून दंड वसूल करण्याऐवजी त्यांना तिडके कॉलनीतील ट्रॅफिक चिल्ड्रन पार्क (Traffic Children park tidake colony) येथे पाठवण्यास सुरुवात केली. दिवसभरात दोन टप्प्यात ही कारवाई करण्यात येत आहे.

ट्रॅफिक चिल्ड्रन पार्कमध्ये हेल्मेट वापराचे महत्त्व विशद करणारी डॉक्युमेंटरी (Documentary) तयार असून, याआधारे हेल्मेटचे महत्त्व दुचाकीस्वारांना पटवून देण्यात येते. ९ सप्टेंबरपासून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे २१ सप्टेंबरपर्यंत दोन्ही सत्रांमिळून एक हजार ३५ जणांचे समुपदेशन करण्यात आले. यात ५२ महिलांचाही समावेश आहे.

Related Stories

No stories found.