करोना संसर्ग झाल्यानंतर करावयाच्या तपासण्या; जाणून घ्या सविस्तर...

करोना संसर्ग झाल्यानंतर करावयाच्या तपासण्या; जाणून घ्या सविस्तर...
करोना बाधित

नाशिक : कोविड १९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिकमध्ये सध्या बिकट परिस्थिती आहे. दररोज हजारो रुग्ण बाधित आढळून येत आहेत. कोविडचा संसर्ग झाल्यानंतर अनेक वेगवेगळ्या तपासण्या करण्यासाठी डॉक्टर सांगतात. या तपासण्या काय दर्शिवतात? या तपासण्या करण्यामागचा डॉक्टरांचा हेतू काय असतो हे सांगितले आहे नाशिकमधील डॉ स्नेहा बच्छाव यांनी...

१. आरटीपीसीआर ( RTPCR – Reverse Transcriptase Polymerase Chain Reaction) - करोनाचा संसर्ग झाला आहे किंवा नाही ते कळते. तसेच यात स्कोर जास्त असला म्हणजे व्हायरल लोड कमी असा अर्थ होतो. २० पेक्षा जास्त असला की कमी व्हायरल लोड. परंतू यात चूका असू शकतात.

२. एच.आर.सी.टी.-HRCT (High Resolution Computed Tomography) - फुफ्फुसाला लागण किती झाली याची मोजणी करणे. अत्याधिक स्कोर २५ ( म्हणजे १०० टक्के) असतो. ५ पर्यंत माईल्ड, ८-१० पर्यंत मध्यम, १४ च्या पुढे गंभीरकडे वाटचाल, २० – अतीगंभीर.

३. रक्त तपासण्या – रुग्ण कोव्हिड-१९ ने गंभीर होत चालला की, प्रामुख्याने आंतरपेशीय दाह किंवा सूज (Inflammation) येणे प्रकार होतो. आपल्या शरिरातील रोग प्रतिबंधात्मक यंत्रणा जोरदार युद्ध सुरू करते. त्यावेळी साईटोकिन नावाचा प्रथिनजन्य स्त्राव सुरू होतो. ह्या प्रक्रियेला साईटोकिनचे वादळ म्हणतात. विषाणूला प्रतिबंध करण्याच्या नादात ही प्रथिने आपल्या फुफ्फुसासारख्या नाजूक अवयवाला हानी पोचवतात.

साईटोकिन वादळामुळे झालेल्या पेशींचा दाह खालील तपासण्यांवरून समजतो. ह्यांमध्ये रेफरन्स रेंज (संदर्भ पातळी) पेक्षा जास्त असल्यास दाह असू शकतो.

अ. इंटरल्युकीन पातळी- Interleukin Level ( IL) : IL-6, TNF-α , IL-8, IL-1β , IL-33

हा साईटोकिनचा प्रकार – त्याचे प्रमाण वाढते.

आ. CRP ( C-reactive protein)- न्युमोनिया वेळीच ओळखता येतो.

इ. ESR- Erythrocytes Sedimentation Rate -लाल रक्तपेशी एकत्र येऊन जड होतात.

ई. ट्रोपोनीन ( Troponin-I) - उच्च रक्तदाब आणि मधूमेह पेशंटमध्ये सायटोका वादळामुळे याची पातळी वाढते.

उ. फेरीटीन (Ferritin) - दाह समजण्याच्या दृष्टीने महत्वाची तपासणी.

ऊ. पांढऱ्या पेशींची संख्यावाढ Leukocytosis (Increased WBCs)

ऋ. PCT – Procalcitonin - टेस्ट मुळे सेप्सीसचे(जंतूसंसर्ग) प्रमाण कळते.

४. रक्त घट्टता तपासणी-D-Dimer Test – रक्तातील रक्तकोषिका कमी होणे (Thrombocytopenia ( Low Platelet Count ) and व रक्त घट्ट होणे/गुठळी होणे ( Thrombosis) असे प्रकार झाल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. D-Dimer ची खूप वाढ झाली की धोक्याचे असते. रक्त पातळ ठेवण्याचा उपचार करावा लागतो.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com