नाशिक | प्रतिनिधी

करोना लसीची प्रतिक्षा संपुष्टात आल्यानंतर आजपासून खऱ्या अर्थाने लसीकरण सुरु झाले. सकाळी विभागीय आयुक्तांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आले.

आज दिवसभरात एकूण १३०० आरोग्य सेवकांना लस दिली जाणार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत ४६३ सेवकांना लस देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. उर्वरित आरोग्य सेवकांना लवकरच लसीकरण केले जाणार आहे.

दर आठवड्याला पाच हजार २०० आरोग्य कर्मचार्यांना लस दिली जाईल. प्रशासनाकडून लसीकरण मोहीमेची तयारी पूर्ण करण्यात आली असून कंट्रोल रुमद्वारे मोहीमचे माॅनिटरींग करण्यात येत आहे.

नाशिक विभागात नाशिकमध्ये सर्वाधिक लसीकरण झाले तर त्यापाठोपाठ नगरमध्ये दुपारी तीनपर्यंत ३९० लसीकरण झाले. त्या खालोखाल धुळे १३५ जळगाव २९७ तर नंदुरबार येथे १३५ आरोग्यसेवकांना लसीकरण करण्यात आले.

नाशिक शहरात सर्वाधिक लसीकरण शहरी आरोग्य केंद्र असलेल्या जेडीसी बिटको येथे झाले. एकूण ४४ आरोग्यसेवकांना लसीकरण करण्यात आले. त्यानंतर मालेगाव सामान्य रुग्णालयात ४२ रुग्णांना लसीकरण करण्यात आले.

जिल्हा रुग्णालय नाशिकमध्ये ३७, इंदिरा गणाधी हॉस्पिटलमध्ये २७, नवीन बिटको २१, कॅम्प वार्ड मालेगाव मध्ये ३५,निमा १ मालेगावमध्ये ३३ तर रमजानपुरा मालेगावात २३, सोयगाव आरोग्य केंद्रात २२ उपजिल्हा रुग्णालय कळवण ५३, चांदवड उपजिल्हा रुग्णालयात ५२ आणि निफाड उपजिल्हा रुग्णालयात २९ तर येवल्यात ४५ सेवकांना लसीकरण करण्यात आले.